For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेल्वे रुळावरून घसरली, 5 ठार

07:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
रेल्वे रुळावरून घसरली  5 ठार
Advertisement

चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसला उत्तर प्रदेशमध्ये दुर्घटना : स्फोटाचा संशय व्यक्त, 25 जखमी

Advertisement

वृत्तसंस्था /गोंडा

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात गुऊवारी मोठा रेल्वे अपघात झाला. दुपारी 3 च्या सुमारास दिब्रुगड एक्स्प्रेसचे (15904) सुमारे 12 डबे ऊळावरून घसरले. ही एक्स्प्रेस रेल्वे चंदीगडहून दिब्रुगडला जात असताना दुर्घटना घडली. अपघातानंतर तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. या अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 27 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातप्रसंगी रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. काही प्रवासी व मोटरमनने स्फोट झाल्यानंतर रेल्वेचे डबे रुळावरून घसरल्याचा दावा केला असला तरी अपघातामागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न रेल्वेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

Advertisement

गोंडा जिल्ह्यातील जिलाही आणि मोतीगंज रेल्वेस्थानकादरम्यान तीन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. अपघाताची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच रेल्वेमंत्र्यांनीही वेळीच संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून मदत व बचावकार्याचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर टेनमध्ये उपस्थित लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रेल्वे अपघातात बळी पडलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी सर्वप्रथम स्थानिक लोक पोहोचले. यानंतर गोंडा प्रशासन आणि रेल्वे लोकांना दिलासा देण्यासाठी सक्रिय झाले. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यता गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसेच गोंडा जिल्हा प्रशासन आणि गोरखपूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारीही पोहोचले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही गोंडा येथील दिब्रुगड रेल्वे अपघाताची दखल घेतली आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य त्वरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जखमींना तातडीने ऊग्णालयात नेण्याचे आणि त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासोबतच जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी मनोकामना व्यक्त केल्या. रेल्वे अपघातानंतर ईशान्य रेल्वेच्या लखनौ विभागाने दिब्रुगड एक्स्प्रेस ऊळावरून घसरल्याबाबत हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत.

एसडीआरएफची टीम घटनास्थळी

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना उत्तर प्रदेशातील दिब्रुगड-चंदीगड एक्स्प्रेस ऊळावरून घसरल्याच्या घटनेची माहिती देण्यात आली आहे. ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि आसाम सरकार संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. मदतकार्याला गती देण्यासाठी लखनौ, बलरामपूर, श्रावस्ती आणि सिद्धार्थनगर येथून चार एसडीआरएफ टीम गोंडा येथे दाखल झाल्या होत्या. गोंडा पोलिसांसह रेल्वे पोलीस दलानेही घटनास्थळी हजर राहून मदतकार्यात हातभार लावला.

खिडकीच्या काचा फोडून प्रवाशांना वाचवले

घटनास्थळाचे फोटो-व्हिडिओही समोर आले असून त्यामध्ये एसी कोचसुद्धा उलटलेले दिसत आहेत. अशा परिस्थितीत प्रवासी जास्त वेळ आत अडकल्यास जखमी आणि मृतांचा आकडा वाढण्याच्या शक्यतेने एसी डब्यांच्या खिडक्मयांच्या काचा फोडून लोकांना बाहेर काढण्यात आले. स्थानिक लोकांसह घटनास्थळी पोहोचलेल्या जिल्हा प्रशासन आणि रेल्वे टीमच्या पथकाने मदतकार्यात मोलाची मदत केली.

घटनास्थळी 40 वैद्यकीय पथके हजर

या अपघातात 27 प्रवासी जखमी झाल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या मदत आयुक्तांनी दिली. प्रवाशांवरील उपचारासाठी घटनास्थळी 40 सदस्यीय वैद्यकीय पथक उपस्थित झाले होते. किरकोळ जखमी प्रवाशांवर घटनास्थळी तातडीने उपचार करण्यात आले. तर गंभीर जखमी प्रवाशांना जिल्हा ऊग्णालयात पाठवण्यात येत होते. 15 ऊग्णवाहिकाही घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या.

अपघातापूर्वी लोको पायलटने ऐकला स्फोटाचा आवाज

गोंडा येथे दिब्रुगड एक्स्प्रेसला झालेल्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातापूर्वी टेनच्या लोको पायलटने स्फोटाचा आवाज ऐकला होता, असा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी टेनच्या दोन्ही लोको पायलटशी चर्चा केल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे यासंबंधी माहिती दिली. अपघातापूर्वी टेनच्या लोको पायलटने मोठा आवाज ऐकला. त्यानंतर काही वेळातच टेनचे डबे ऊळावरून घसरले. हा कसला स्फोट होता? ट्रॅकवर काही होतं का? यात काही षड्यंत्र आहे का? या स्फोटामुळेच रेल्वेचे डबे ऊळावरून घसरले का? त्याची माहिती तपासानंतर समोर येईल असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सध्या एक्स्प्रेसचे दोन्ही लोको पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.