For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्गात 3 व 4 रोजी पावसाची शक्यता

03:53 PM Dec 02, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सिंधुदुर्गात 3 व 4 रोजी पावसाची शक्यता
Advertisement

प्रशासनाकडून यलो अलर्ट जारी

Advertisement

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्याला 3 व 4 डिसेंबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, 30 ते 40 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची व गडगडाट होवून विजा चमकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे

Advertisement

मागील दोन दिवसात पुन्हा थंडीचा जोर ओसरला आहे. 28-29 नोव्हेंबरच्या तुलनेत तापमान वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे ऐन थंडीत पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. फेंगल चक्रीवादळाचा धोका कमी झाला असला तरी त्याचे परिणाम अजूनही हवामानावर दिसून येत आहेत. फेंगल चक्रीवादळाचा समुद्रकिनारपट्टीलगतच्या भागांवर मोठा परिणाम होणार आहे. ऐन थंडीत पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या रिमझिम पावसाच्या सरी बरसतील, 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी पावसाचा जोर वाढेल. विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. 5 नोव्हेंबर रोजी पुन्हा पावसाचा जोर कमी होईल.

Advertisement
Tags :

.