For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महायुतीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा

04:05 PM Dec 04, 2024 IST | अनुजा कुडतरकर
महायुतीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा
Advertisement

महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर

Advertisement

मुंबई -

भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली आहे. भाजपच्या गटनेते पदाची निवड झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानं तेच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हे निश्चित झाले आहे. तर महायुतीमधील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची आज एक महत्त्वाची बैठक वर्षा निवासस्थानीवर पार पडली. या बैठकीनंतर आता राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी महायुतीचे हे तिन्ही नेते राजभवनावर दाखल झाले आहेत. दरम्यान, संख्याबळासाठी आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र राज्यापालांना देण्यात आलं आहे. देवेंद्र फडणीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, उद्या संध्याकाळी साडे पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहेत. महायुतीच्या नव्या सरकारामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा जुनाच पॅटर्न कायम राहणार आहेत. उद्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री देखील शपथ घेणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.