महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आगामी 24 तासात जोरदार पावसाची शक्यता

11:20 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : राज्यात गेल्या 24 तासांमध्ये सर्वत्र जोरदार पावसाची नोंद झाली. सरासरी सुमारे सव्वा इंच पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 2.5 इंच पावसाची नोंद पणजीत झाली. आगामी 24 तासांत काही भागात जोरदार तर काही भागात हलक्या स्वऊपात पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गेल्या 24 तासांमध्ये पणजीत 2.5 इंच, मुरगाव 2.5 इंच, केपे 1.50 इंच, पेडणे 1.5 इंच, दाबोळी 1.50 इंच, जुने गोवे 1 इंच, सांखळी 1 इंच, मडगाव पाऊण इंच, सांगे पाऊण इंच व फोंडामध्ये अर्धा इंच पावसाची नोंद झाली. काणकोणमध्ये 1 से.मी. पेक्षाही कमी पाऊस पडला. म्हापसा, वाळपईमध्येही तुरळक पावसाची नोंद झाली. गुऊवारी सकाळी पणजी व आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडला. गोव्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडल्याची नोंद आहे. आगामी 24 तासांमध्ये गोव्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article