For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आज, उद्या मान्सूनच्या आगमनाची शक्यता

06:08 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
आज  उद्या मान्सूनच्या  आगमनाची शक्यता
Advertisement

पारा आणखीन वाढण्याची शक्यता, येलो अलर्ट जारी 

Advertisement

पणजी/ विशेष प्रतिनिधी

गोव्यात मान्सूनला पूरक असे वातावरण निर्माण झाले असून उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटकमध्ये तो सक्रिय झालेला आहे. आज व उद्या गोव्यात मान्सूनचे आगमन होऊ शकते. दरम्यान, आगामी 24 तासांत राज्यात सर्व ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Advertisement

गेल्या 24 तासात राज्यात अनेक भागात हलक्यास्वरूपात तर मध्यरात्रीच्या सुमारास गोव्यातील बऱ्याच भागात मध्यम आणि जोरात पाऊस पडून गेला.  मुरगाव केंद्रावर दीड इंच पावसाची नोंद झाली तर दाबोळी केंद्रावर एक इंचापेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडला. वाळपई भागात पाऊण इंच, सांगे, पणजी, सांखळी या भागातही हलक्या स्वरूपाचा पाऊस आला. आज पारा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी तापमान 35 डिग्री सेंटीग्रेडच्याही पुढे गेले. दरम्यान, पुढील 48 तासात गोव्यात मध्यम तथा हलक्या स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटास  पडणार असून हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.

पारंपरिक मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला आहे. सोमवारी दुपारनंतर सर्वत्र पावसाचे ढग जमले व त्यामुळे उकाड्याने नागरिक त्रस्त झाले, मात्र पाऊस पडला नाही. सायंकाळी उशिरापर्यंत पारा बराच वर गेलेला होता व पावसाने कोणताही दिलासा दिला नाही. आता गोव्याला वेध आहेत ते मान्सूनचे.त्याचे आगमन कोणत्या दिवशी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

Advertisement
Tags :

.