For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेन्नईसमोर फॉर्मात आलेल्या पंजाब किंग्जचे आज आव्हान

06:51 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
चेन्नईसमोर फॉर्मात आलेल्या पंजाब किंग्जचे आज आव्हान
Advertisement

वृत्तसंस्था/ धर्मशाला

Advertisement

गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आज रविवारी आयपीएलमध्ये सलग दुसऱ्यांदा पंजाब किंग्जचा सामना करताना आपली गाडी रुळावर आणण्याचा आणि विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. अवघ्या तीन दिवसांपूर्वी पंजाबने चेन्नईचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या चेपॉक येथे सीएसकेला सात गडी राखून पराभूत करून दाखविले होते.

 

घरच्या मैदानावरील मागील तीन सामन्यांतील दोन पराभवांमुळे चेन्नई 10 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर राहिला आहे आणि नॉकआऊट टप्प्यातील स्थान निश्चित करण्यासाठी केवळ चार सामने त्यांच्या हाती आहेत. पंजाबविरुद्धच्या मागील सामन्यात हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर या फिरकी जोडीविऊद्ध मधल्या षटकांमध्ये वेग वाढवण्यात सीएसकेला अपयश आल्याने 7 बाद 162 अशी कमी धावसंख्या त्यांना उभारता आली. त्यांची फलंदाजी कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांच्यावर खूप अवलंबून आहे आणि ज्या क्षणी त्यांच्यापैकी एकटा अपयशी ठरतो तेव्हा इतरांवर दबाव येतो. पण संघाला सावरण्याच्या बाबतीत इतरांना सातत्य दाखविता आलेले नाही.

Advertisement

गायकवाडने मोसमातील पाचवे अर्धशतक झळकावलेले असले, तरी अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा चांगल्या सुऊवातीचा फायदा घेण्यात अपयशी ठरला आहे. रवींद्र जडेजा आणि समीर रिझवी यांना फिरकीविऊद्ध संघर्ष करावा लागलेला आहे. दीपक चहरसह त्यांच्या वेगवान गोलंदाजांबद्दलच्या तंदुऊस्तीच्या चिंतेमुळे सीएसकेसमोर समस्या निर्माण झाली आहे. दीपक चहर आजच्या लढतीला मुकण्याची शक्यता आहे. त्यातच मागील सामन्यात मथीशा पाथिराना आणि तुषार देशपांडे खेळू न शकल्याने भर पडली. जोडीला दव महागात पडला. रिचर्ड ग्लीसनने मागील सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केलेले असून सीएसके मुकेश चौधरीला परत आणू शकतो.

दुसरीकडे, पंजाब किंग्जने प्लेऑफच्या आशा पुन्हा प्रज्वलित करताना लागोपाठ विजयांची नोंद केली आहे. पंजाब हा चेन्नईला सलग पाच वेळा पराभूत करणारा मुंबई इंडियन्सनंतरचा दुसरा संघ बनला आहे. असे असले, तरी पंजाब हा एक अंदाज बांधता न येण्याजोगा संघ असून ते 8 गुणांसह सातव्या स्थानावर पोहोचले आहेत. केकेआरविऊद्ध शतक झळकावणारा जॉनी बेअरस्टो हा त्यांचा आधारस्तंभ असून रिली रोसोव्ह, शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग यांनाही भरीव योगदान dद्यावे लागेल. त्यांच्या गोलंदाजी विभागात कागिसो रबाडा, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि सॅम करन अशी अनुभवी नावे असून त्यांनी सातत्य राखण्याची गरज आहे. फिरकीपटू हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर यांच्यावरही पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्याचा दबाव असेल.

संघ : चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एम. एस. धोनी अरावेली अवनीश, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मोईन अली, शिवम दुबे, आर. एस. हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय जाधव मंडल, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, निशांत सिंधू, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रेहमान, मथीशा पाथिराना, सिमरजित सिंग, प्रशांत सोळंकी, शार्दुल ठाकूर, महीश थीक्षाना आणि समीर रिझवी.

पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम करन, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वथ कवेरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंह, शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, रिली रोसोव्ह.

सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.

Advertisement
Tags :

.