कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangali : तासगाव-कवठेमहांकाळमध्ये मंगळवारी चक्काजाम !

04:11 PM Oct 13, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

         सरसकट पंचनामे व कर्जमाफीसाठी संजयकाका आक्रमक

Advertisement

सांगली : सांगली जिल्ह्याच्या तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांमध्ये यंदाच्या अतिवृष्टीसदृश पावसामुळे झालेल्या अभूतपूर्व पीक नुकसानीबाबत तातडीने न्याय मिळावा, यासाठी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

Advertisement

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि त्वरित भरीव आर्थिक मदत मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी तासगाव आणि कवठेमहांकाळ येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या आंदोलनात दोन्ही तालुक्यातील शेतकयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तासगाव कवठेमहांकाळचे युवा नेते प्रभाकरबाबा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी बोलताना प्रभाकर बाबा पाटील म्हणाले, अतिवृष्टीमुळे तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांमध्ये झाक्ष, ऊस, सोयाबीन, उडी, भुईमूग, मका, हुलगा, भाजीपाला आणि इतर फळपिके यांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले पीक पूर्णपणे वाया गेले आहे. या गंभीर परिस्थितीत, नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याची गती अत्यंत संथ असल्याने, मोठ्या प्रमाणात शेतकरी नुकसान भरपाईपासून बंचित राहण्याची भीती पाटील यांनी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले शेतकयांचे नुकसान टाळण्यासाठी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी पंचनामे संदर्भात मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, कवठेमहांकाळ तहसीलदार, तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे, तासगाव तालुका कृषी अधिकारी अनिल फोडे, कवठेमहांकाळचे कृषी अधिकारी यांच्यासह दोन्ही तालुक्यातील मंडल अधिकारी, कृषी सहाय्यक, तलाठी ग्रामसेवक यांच्याबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली आहे

त्याचबरोबर आम्ही प्रशासनाकडे तासगाव कवठेमहांकाळसह सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी तातडीने जाहीर करावी. अतिवृष्टी नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकयांना त्वरित व भरीव आर्थिक मदत लवकरात लवकर वितरित करावी. सांगली जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून बँकांची व सोसायटीची कर्ज वसुली तातडीने थांबवावी, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देण्यात याव्यात.

या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, मंगळवारी १४ ऑक्टोबर रोजी बक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस प्रशासन जबाबदार असेल, असा निर्वाणीचा इशारा यावेळी देण्यात आला

आंदोलनाचे ठिकाण व वेळ

ऐका सरकार बळीराजाचा एल्गार, कर्जमुफी हा शेतकयांचा अधिकार अशा घोषणा देत समस्त शेतकरी बांधवांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तासगाव येथे सकाळी नऊ वाजता एस.टी. स्टॅन्ड चौक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच कवठेमहांकाळ येथे दुपारी एक बाजता तहसीलदार कार्यालयसमोर, जुने स्टॅन्ड, येथे श्रक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांनी आपल्या न्याय अधिकारासाठी आणि हक्कासाठी या आंदोलनात सहभागी व्हावे. आपापल्या गावातील ट्रॅक्टर व पैलगाडी घेऊन चक्काजाम आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

तासगाव आणि कवठेमहांकाळ येथे चक्काजाम आंदोलन

कवठेमहांकाळ : अतिवृष्टीमुळे कवठेमहांकाळ तालुक्यात झालेल्या पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकयांना सरसकट कर्जमाफी व त्वरित आर्थिक मदत मिळावी या मागण्यांसाठी माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता तहसील कार्यालयासमोर, जुना स्टॅन्ड, येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती युवा नेते प्रभाकर पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली, या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे द्राक्ष, ऊस, सोयाबीन, उडीद, भुईमुग, मका, हुलगा, भाजीपाला आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मात्र, अजूनही पंचनाम्यांचे काम संथ गतीने सुरू असून, शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच काकांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना मदतीचा हात सरकारने द्यावा. म्हणून आंदोलन करण्यात येणार आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या आंदोलनागा सहभागी व्हावे, असे आवाहन युवानेते प्रभाकर पाटील यांनी केले आहे. या पत्रकार बैठकीला जनार्दन पाटील, नामदेव पाटील, अमित शिंत्र हे उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#Maharastra#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaMaharastra PoliticsmirajPolitical Newspolitics newssanglisangli newstasagav
Next Article