चैतन्य मजगावकरची निवड
10:14 AM Nov 19, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
खानापूर : श्री चांगळेश्वरी मंडळ संचलित गणेबैल हायस्कूल गणेबैलचा विद्यार्थी चैतन्य पुंडलिक मजगावकर या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बेळगाव येथील जिल्हा क्रीडागंणावर नुकत्याच पार पडलेल्या 17 वर्षाखालील जिल्हास्तरीय स्पर्धेतील उंचउडी प्रकारात त्याने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. याला शाळेचे मुख्याध्यापक आर. बी. पाटील, क्रीडा शिक्षक ए. डी. घाडी तसेच व्यवस्थापक जी. आर. मेरवा यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article