युनायटेड गोवन्स बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ
11:18 AM Dec 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : युनायटेड गोवन्स रिव्रेशन संघटना आयोजित युनायटेड गोवन्स चषक आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. युनायटेड गोवन्सच्या सभागृहात आयोजित आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे संघटनेचे अध्यक्ष शंतनू पुसाळकर, सचिव इग्नसेस मस्कारेन्स, डॉ. जॉर्ज रॉड्रिमक्स, सुनील कल्याणपुरकर, थॉमस पेस, राजन आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्याद्यांच्या चालीने स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेत बेळगाव शहर, बागलकोट व हुबळी येथून जवळपास 60 स्पर्धकांनी भाग घेतला होता. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत शुक्रवारी अंतिम फेरीचे सामने होऊन त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
Advertisement
Advertisement