महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहरात चेनस्नॅचर्सचा उच्छाद सुरूच

11:13 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महांतेशनगरमध्ये भामट्यांचा गुरुवारी अयशस्वी प्रयत्न

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात गुन्हेगारांचा उच्छाद सुरूच आहे. गुरुवारी रात्री महांतेशनगर परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी एका महिलेच्या अंगावरील दागिने पळविण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. सातत्याने होणाऱ्या चोऱ्या, घरफोड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांबरोबरच पोलीस यंत्रणाही हैराण झाली असताना चेनस्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगारांनीही पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे. 16 ऑगस्ट रोजी श्रावण शुक्रवारनिमित्त नातेवाईकांकडे वरदमहालक्ष्मी पूजेसाठी गेलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे पळविण्यात आली होती.

Advertisement

त्यानंतर गुरुवारी रात्री पुन्हा चेनस्नॅचिंगचा प्रयत्न झाला आहे. मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी महांतेशनगर येथे पायी चालत जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील दागिन्यांना हात घालून ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. भामट्याने धक्का मारल्यामुळे महिला खाली पडली. तिने आरडाओरड सुरू केली. महिलेची आरडाओरड सुरू होताच मोटारसायकलवरून आलेल्या भामट्यांनी तेथून पळ काढला आहे. घटनेची माहिती समजताच माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. यासंबंधी एफआयआर दाखल झाला असल्याचे सांगण्यात आले. चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांपाठोपाठ चेनस्नॅचिंग करणाऱ्या भामट्यांनीही पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे.

महिलांनी सावधगिरी बाळगण्याची गरज...

श्रावण मासानिमित्त देवदर्शनाला जाताना किंवा शुक्रवारच्या वरदमहालक्ष्मी पूजनाला जाताना महिला आपल्या अंगावर दागिने घालून घराबाहेर पडतात. त्यामुळेच भामट्यांनी गुरुवार व शुक्रवारचा मुहूर्त साधला आहे. 30 ऑगस्ट रोजी श्रावणातील शेवटचा शुक्रवार आहे. चेनस्नॅचिंगचे प्रकार टाळण्यासाठी महिलांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article