कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Satara : पाटण-चिपळूण मार्गावर तीन ट्रकांचा साखळी अपघात

04:31 PM Nov 29, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                                   तीन ट्रकच्या अपघातात एकजण गंभीर जखमी

Advertisement

पाटण : तामकणे (ता.पाटण) गावच्या हद्दीत गुरुवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या एका वळणावर चिपळूणच्या दिशेने निघालेले तीन माल वाहतूक करणारे ट्रक एकमेकांवर जोरवार आवळून अपघात झाला. या अपघातात कंटेनरचे केबीन पूर्णपणे चक्काचूर झाल्याने त्यात चालक अडकला होता. तब्बल आठ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ट्रकचे केबीन कटरच्या सहाय्याने तोडून चालकाला बाहेर काढण्यात आले. यात चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत

Advertisement

याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी पाटणहून चिपळूणच्या दिशेने मालवाहतूक करणारे तीन ट्रक निघाले होते. तामकणे गावच्या हद्दीत हे तीन ट्रक आले असता रस्ता खराब असल्याने तसेच रस्त्याचा अंदाज न आल्याने अचानक ब्रेक मारल्याने तिन्ही ट्रक एकमेकांवर जोरदार आदळून अपघात झाला. त्पातील एका ट्रकचे केबिन पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने चालक अडकून पडला होता.

अपघाताची माहिती स्थानिकांनी पाटण पोलिसांना दिल्यानंतर पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. अपघातात ट्रकचालक पूर्णपणे अडकल्याने त्याला बाहेर काढणे गरजेचे होते. पोलीस यंत्रणेने स्थानिक युवक व यांत्रिक कारागीर यांच्या मदतीने चालकास बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. घटनास्थळी अंधार असल्याने अडचणी येत होत्या. रात्रभर चालक ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडला होता. पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सदगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय राऊत, संतोष माने, शरद गुरव, उमेश मोरे, मच्छिंद्र जाधव व स्थानिक युवकांनी शर्थीचे चालकाला बाहेर काढले. अपघातात तीनही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची नोंद पोलिसांत झाली आहे.

Advertisement
Tags :
#AccidentAlert#DriverRescue#EmergencyRescue#HeavyVehicleCrash#karadnews#PatanAccident#RoadSafety#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#TruckAccident#TruckcrashLocalNews
Next Article