महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

छ. शिवाजी क्लस्टरच्या बुद्धिबळ-योग स्पर्धांना प्रारंभ

10:42 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एसकेई कन्नड शाळेचे आयोजन

Advertisement

बेळगाव : शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या व एसकेई सोसायटी कन्नड स्कूल आयोजित प्राथमिक विभागीय छ. शिवाजी क्लस्टर टिळकवाडी, अनगोळ, शहापूर विभागाच्या बुद्धिबळ व योगा स्पर्धांना मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. भाग्यनगर येथील एस. के. गिरी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटक शुभम बागेवाडी, अक्षय देसाई, विनोद बडची, मुख्याध्यापिका सावित्री नायक, गायत्री शिंदे, वैजनाथ भट्ट, पी. एस. खणगावकर, टिळकवाडी शारीरिक संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील व प्रवीण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते सोंगट्याची चाल करुन व योगासनाच्या आसनांना चालना देवून दोन्ही स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. या बुद्धिबळ व योगा स्पर्धेत टिळकवाडी, अनगोळ व शहापूर विभागातील सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यावेळी क्रीडा शिक्षक अनुराधा पुरी, उमेश बेळगुंदकर, अर्जुन भेकणे, रामलिंग परीट, जयसिंग धनाजी, कल्लाप्पा हागिदळे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन जे. डी. जरे यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article