For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीजी पॉवर करणार 7600 कोटी रुपयांची गुंतवणूक

06:18 AM Mar 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
सीजी पॉवर करणार 7600 कोटी रुपयांची गुंतवणूक
Advertisement

सेमीकंडक्टर निर्मितीसाठी करणार खर्च : संयुक्त भागीदारीतून राबवणार प्रकल्प

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

सीजी पॉवर आणि इंडस्ट्रीयल सोल्युशन ही कंपनी संयुक्त भागीदारीतून सेमी कंडक्टरची निर्मिती करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदरच्या प्रकल्पासाठी 7 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना कंपनीने आखली आहे.

Advertisement

पुढील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये वरील गुंतवणूक टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. गुजरातमधील साणंद येथे सेमीकंडक्टर निर्मिती कारखाना स्थापन करण्याची योजना आहे. रिनीसस इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन यांच्यासोबत सेमीकंडक्टरची निर्मिती सीजी पॉवर कंपनीकडून केली जाणार आहे.

प्रकल्पाला केंद्राची मंजुरी

देशांतर्गत उत्पादन प्रक्रियेला वेग देण्यासाठी केंद्र पुढाकार घेत आहे. याअंतर्गत शुक्रवारी भारतात सेमीकंडक्टर निर्मितीच्या सीजी पॉवरच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. केंद्रिय मंत्रिमंडळाने सदरच्या प्रकल्पाला मंजुरी दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. संयुक्त भागीदारीतील प्रकल्पामध्ये सीजी पॉवरचा वाटा हा 92 टक्के इतका असणार आहे. साणंदमधील कारखान्यामधून प्रति दिवसाला 1 कोटी 50 लाख इतक्या सेमीकंडक्टरची निर्मिती होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Advertisement
Tags :

.