सीईटीचा आज निकाल
07:00 AM May 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक कोर्स प्रवेशासाठी कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने घेतलेल्या सामान्य प्रवेश परीक्षेचा (सीईटी) निकाल शनिवार 24 मे रोजी जाहीर होणार आहे. अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक कोर्सच्या प्रवेशासाठी राज्यातील 775 केंद्रांवर 16 एप्रिल रोजी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र व 17 एप्रिल रोजी गणित आणि जीवशास्त्र विषयांचे पेपर घेण्यात आले होते. बारावी परीक्षा-1 आणि परीक्षा-2 चा निकाल, सीबीएसई, आयसीएसईचे निकाल यापूर्वीच प्रसिद्ध झाले असून आता शनिवारी सीईटीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 23 मे रोजी निकाल जाहीर करण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे निकाल एक दिवस पुढे ढकलण्यात आला. सीईटीचा निकाल दुपारपर्यंत le http://cetonline.karnataka.gov.in/kea/ या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाणार आहे.
Advertisement
Advertisement