For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरकारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता सीईटी-नीट परीक्षांचे मार्गदर्शन

10:26 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
सरकारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता सीईटी नीट परीक्षांचे मार्गदर्शन
Advertisement

जि.पं.सीईओंकडून प्राचार्यांना मार्गदर्शन : चार समित्यांची रचना : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मोलाचे ठरणार

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यातील सर्व सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना सीईटी आणि नीट परीक्षेसंदर्भातील पूर्वतयारीबाबतचे मार्गदर्शन करावे, त्यांच्यासाठी अभ्यास परीक्षा घेण्यात याव्यात, उपलब्ध असणाऱ्या माहिती संपन्मूल प्राध्यापकांच्या माध्यमातून परीक्षा घेण्याची सूचना जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी केली. जि. पं. सभागृहामध्ये बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यांतील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

सीईटी आणि नीट परीक्षांची पूर्वतयारी करण्यासाठी समित्यांची रचना करण्यात यावी, केईएकडून चालविण्यात येणाऱ्या सीईटीच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका तयार करून प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या शनिवारी पीयूसी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी पीयूसी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास परीक्षा घेण्यात याव्यात, अशी सूचना त्यांनी प्राचार्यांना केली. बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक विभागांसाठी चार समित्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Advertisement

पहिल्या शैक्षणिक समितीकडून सीईटी व नीट अभ्यासक्रमाबाबतच्या परीक्षा व्यवस्थितपणे घेणे, प्रशासकीय समितीकडून प्रश्नपत्रिका तयार करणे आणि निकालानंतर प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करणे. ओएमआर स्कॅनिंग समितीकडून परीक्षेचे नियोजन व सुरक्षितपणे परीक्षा घेणे. समन्वय समितीकडून ओएमआर स्कॅनिंग करणे, महाविद्यालयानुसार निकाल प्रसिद्ध करणे, सदर समिती दोन्ही जिल्ह्यांसाठी यापुढे समन्वयाने काम करणार आहे.

त्यानुसार शनिवार दि. 24 रोजी पीयूसी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना प्रथम अभ्यास परीक्षा केईएच्या एसओपी नियमांतर्गत बेळगाव आणि चिकोडी विभागात एकाच वेळी परीक्षा घेणे सक्तीचे आहे. याचबरोबर परीक्षेचे पावित्र्य आणि गुप्तता राखण्याची सूचनाही त्यांनी केली. सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी प्रतिभावंत आहेत.

सीईटी आणि नीट परीक्षांचे मार्गदर्शन करण्याच्या माध्यमातून शैक्षणिक दर्जा सुधारणे, तसेच या परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षांसाठीचे मनोबल उंचावणे, तसेच भविष्यातील परीक्षांबाबत असणारे भय दूर करण्यासाठी या परीक्षा महत्त्वाच्या ठरणार असल्याचे अनेक जणांनी सांगितले. यावेळी जि. पं. योजनाधिकारी गंगाधर दिवटर, उपनिर्देशक एम. एम. कांबळे, चिकोडी विभागाचे उपनिर्देशक पी. आय. भंडारे, शिक्षण समितीचे सदस्य एफ. एम. कापसे, बी. वाय. हन्नूर आदी उपस्थित होते.

चार समित्यांची रचना 

शैक्षणिक समिती, प्रशासकीय समिती, ओएमआर स्कॅनिंग समिती आणि समन्वय समिती.

Advertisement
Tags :

.