सातार्डा येथे फॅशन डिझायनिंग प्रशिक्षणार्थिंना प्रशस्तीपत्रक वितरण
सातार्डा -
आगामी काळात महिलांच्या मागणी प्रमाणे ग्रामपंचायतमार्फत प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन केले जाणार आहे. महिला सक्षम आहेत.प्रशिक्षणाचा उपयोग महिलांनी प्रगतीसाठी करावा.ग्रामपंचायतकडून महिलांना मदत करण्यात येणार आहे असे प्रतिपादन सरपंच बाळू प्रभू यांनी केले.
श्री . शणई यांच्या निवासस्थानी ग्रामपंचायत कार्यालय व कोकण कला व शिक्षण विकास संस्था आयोजित मोफत फॅशन डिझायनिंग प्रशिक्षणार्थिंना प्रशस्तीपत्रक वितरण करण्यात आले . या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.यावेळी सरपंच श्री प्रभू यांनी महिलांशी संवाद साधला.महिला आर्थिक विकासामधून सूट -बॅग बनविणाऱ्या अक्षता घाडी तसेच मसाला, लोणचे व पापड उद्योग करणाऱ्या सृष्टी वेंगुर्लेकर यांना सरपंच श्री प्रभू यांनी सन्मानित केले.
यावेळी उपसरपंच उत्कर्षां पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद जाधव, वासुदेव राऊळ, अर्चना धारगळकर, विशाखा पारिपत्ये, ग्रामसेवक एस आर राऊळ,कोकण कला संस्थेचे समन्वयक समीर शिर्के, प्रशिक्षिका नम्रता पालयेकर, प्राथमिक शाळेच्या शालेय समिती अध्यक्षा सृष्टी वेंगुर्लेकर, सिआरपी स्नेहा पारिपत्ये आदी व्यासपीठावर उपस्थित होते.