For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीईओ टी.व्ही.नरेंद्रन बनले जागतिक स्टीलचे अध्यक्ष

06:11 AM Oct 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
सीईओ टी व्ही नरेंद्रन बनले जागतिक स्टीलचे अध्यक्ष
Advertisement

दुसरे भारतीय : सज्जन जिंदाल यांनी 2021 मध्ये प्रथम असे स्थान पटकावले

Advertisement

मुंबई :

टाटा स्टीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) थाचट विश्वनाथ नरेंद्रन यांची वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. नरेंद्रन हे पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत या पदावर कार्यरत राहणार आहेत. जागतिक पोलाद संघटनेच्या प्रमुखपदी भारतीय व्यक्तीची निवड होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2021 मध्ये जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी या संस्थेचे नेतृत्व केले होते. नरेंद्रन यांच्यासोबत, कोलाकोग्लू मेटॅलर्जी एएसचे उगुर दलबेलर आणि नुकोर कॉर्पचे अध्यक्ष आणि सीईओ लिओन टोपलियन या दोन अन्य बोर्ड सदस्यांचीही संस्थेत निवड झाली आहे.

Advertisement

असोसिएशनने लिहिले की, ‘वर्ल्ड स्टील टाटा स्टीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विश्वनाथ नरेंद्रन आणि इतर दोन सदस्यांचे स्वागत करताना आनंद होत आहे. नरेंद्रन यांचाही 15 सदस्यीय कार्यकारिणीत समावेश झाला. सज्जन जिंदाल, आर्सेलर मित्तल आणि जेएफई आणि पॉस्कोचे इतर उच्चस्तरीय अधिकारी येथे उपस्थित होते. जागतिक स्टील असोसिएशनमध्ये जगातील 85 टक्के स्टील उत्पादक आहेत

असोसिएशनची व्याप्ती

वर्ल्ड स्टील असोसिएशन जगभरातील पोलाद उद्योगाचा मोठा भाग व्यापते. जगातील एकूण पोलाद उत्पादनापैकी 85 टक्के त्याचे सदस्य आहेत.

या संस्थेमध्ये 160 हून अधिक स्टील उत्पादक, राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्टील असोसिएशन आणि स्टील संशोधन संस्थांचा समावेश आहे. ही संस्था पोलाद उद्योगात सहकार्य आणि देवाणघेवाण करण्यासाठी एक प्रमुख स्थिर व्यासपीठ आहे.

नरेंद्रन 1988 मध्ये टाटा स्टीलमध्ये रुजू

नरेंद्रन 1988 मध्ये टाटा स्टीलमध्ये रुजू झाले. टाटा स्टीलमध्ये नरेंद्रन यांनी सेफ्टी आणि फ्लॅट प्रॉडक्ट्स विभागाचे उपाध्यक्ष आणि टाटा स्टील इंडिया आणि दक्षिणपूर्व आशियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले. टाटा टिस्कॉन ब्रँड आणि वितरण नेटवर्कमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शैक्षणिक पार्श्वभूमी पाहता नरेंद्रन एनआयटी, तिरुचिरापल्ली येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि एमबीए केले आहे.

Advertisement
Tags :

.