For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्णधार सहारन, धस यांची शतके

06:49 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्णधार सहारन  धस यांची शतके
Advertisement

वृत्तसंस्था/ ब्लोमफौंटेन

Advertisement

आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटातील पुरुषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी येथे खेळवण्यात आलेल्या सुपर सिक्स फेरीतील गट 1 च्या शेवटच्या सामन्यात कर्णधार उदय सहारन आणि सचिन धस यांच्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने दुबळ्या नेपाळला विजयासाठी 298 धावांचे आव्हान दिले. भारताने 50 षटकात 5 बाद 297 धावा जमवल्या. सहारनने 100 तर धसने 116 धावा झळकवल्या.

या सामन्यात भारतीय युवा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेपाळच्या अचूक गोलंदाजीसमोर भारताचे पहिले तीन फलंदाज 14 षटकात 62 धावात बाद झाले. डावातील पाचव्या षटकात नेपाळच्या गुलशन झाने सलामीच्या आदर्श सिंगला झेलबाद केले. त्याने 18 चेंडूत 4 चौकारासह 21 धावा जमवताना आर्शिन कुलकर्णी समवेत पहिल्या गड्यासाठी 26 धावांची भागीदारी केली. आर्शिन कुलकर्णी आणि मोलिया यांनी दुसऱ्या गड्यासाठी 35 धावांची भर घातली असताना मोलिया एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला. त्याने  36 चेंडूत 1 चौकारासह 19 धावा जमवल्या. आर्शिन कुलकर्णी पाठोपाठ तंबूत परतला आकाशचंदने त्याला झेलबाद केले. कुलकर्णीने 2 चौकारासह 18 धावा जमवल्या.

Advertisement

द्विशतकी भागीदारी

कर्णधार सहारन आणि सचिन धस यांनी चौथ्या गड्यासाठी 33.4 षटकात 215 धावांची द्विशतकी भागीदारी केली. सचिन धसने 101 चेंडूत 3 षटकार आणि 11 चौकारासह 116 तर कर्णधार सहारनने 107 चेंडूत 9 चौकारासह 100 धावा जमवल्या. मुशीर खान 9 धावावर नाबाद राहिला. भारताच्या डावात 3 षटकार आणि 28 चौकार नोंदवले गेले. भारताने पहिल्या पॉवर प्लेच्या 10 षटकात 49 धावा जमवताना एक गडी गमवला. सहारन आणि धस यांनी शतकी भागीदारी 106 चेंडूत तर द्विशतकी भागीदारी 194 चेंडूत पूर्ण केली. नेपाळतर्फे गुलशन झाने 56 धावात 3 तर आकाशचंदने 65 धावात एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : भारत 50 षटकात 5 बाद 297 (उदय सहारन 100, सचिन धस 116, आदर्श सिंग 21, कुलकर्णी 18, मोलिया 19, मुशीर खान नाबाद 9, अवांतर 14, गुलशन झा 3-56, आकाश चंद 1-65).

Advertisement
Tags :

.