For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur : सोलापुरात केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

05:36 PM Nov 06, 2025 IST | NEETA POTDAR
solapur   सोलापुरात केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी
Advertisement

                             केंद्रीय पथकाचा सोलापूर दौरा

Advertisement

सोलापूर : अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या शेती, पायाभूत सुविधा व सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक मागील दोन दिवसांपासून सोलापूर दौऱ्यावर आहे. बुधवारी सकाळी त्यांनी दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीसह अन्य भागाची पाहणी केली.

या पथकात केंद्रीय ग्राम विकास विभागाचे अवर सचिव अभिषेक कुमार, ऊर्जा विभागाचे उपसंचालक करन सरीन, वित्त विभागाचे उपसचिव कंदर्फ पटेल आणि जलशक्ती विभागाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग यांचा समावेश होता.

Advertisement

केंद्रीय पथकाने दक्षिण सोलापूरतालुक्यातील वडकबाळ व हत्तूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील तिडे आणि शिवणी या गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.यावेळी वहकबाळ येथे बंधाऱ्याची स्थिती, शेतीचे झालेले नुकसान आणि वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनवरील नुकसानीचा आढावा घेण्यात आला. हत्तूर येथे रस्त्यांची अवस्था, शेतातील नुकसानीसह जिल्हा परिषद शाळेच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली.

तिचे येथे समशानभूमी व शेतीवरील नुकसानीची माहिती घेण्यात आली. तर शिवणी येथे घरांची पडझड व जिल्हा परिषद शाळा इमारतीच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती, पिकांच्या नुकसानीसह सिंचन विहिरींच्या स्थितीची माहिती जाणून घेतली.

या पथकास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वडकबाळ, हत्तूर, तिडे व शिवणी येथे झालेल्या शेती, रस्ते, वीज वितरण, शाळा व स्मशानभूमीच्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे व सुमित शिंदे, उत्तर सोलापूर तहसीलदार निलेश पाटील, दक्षिण सोलापूर तहसीलदार किरण जमदाडे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी व इतर संबंधित विभागांचे अधिकारी आणि नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.