कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्रीय पथक आज बेळगावात

11:52 AM Mar 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : स्वच्छ सर्वेक्षणासाठी 5 जणांचे केंद्रीय पथक सोमवार दि. 10 रोजी बेळगावला येणार आहे. याबाबतची माहिती महापालिकेला केंद्र सरकारकडून कळविण्यात आली आहे. या पथकाकडून शहरात पाहणी करण्यासह नागरिकांची मते आजमावली जाणार आहेत. गतवर्षी जानेवारी 2024 मध्ये स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यात बेळगाव शहर 198 व्या क्रमांकावर होते. स्वच्छ शहरांमध्ये बेळगावची घसरण झाली होती. पण यंदा बेळगाव महापालिकेकडून कचरा वर्गीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. त्यामुळे 80 टक्के कचऱ्याचे वर्गीकरण होत असून त्यामुळे महिन्याला 10 लाख रुपयांची बचत होत आहे. तसेच त्याचबरोबर ठिकठिकाणी टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे देखील वर्गीकरण केले जात आहे.

Advertisement

यावेळी कचऱ्याचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करण्यात येत असल्याने स्वच्छ सर्वेक्षणाच्या निकालात बेळगाव महापालिकेला चांगले स्थान मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये 2017 पासून बेळगाव महानगरपालिकेने सहभाग घेतला आहे. यात पहिल्या 100 शहरांमध्ये स्थान मिळावे यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. पण उलट महापालिकेचे स्थान घसरू लागले आहे. 2022 मध्ये बेळगाव महापालिकेला 171 वे स्थान मिळाले होते. 2023 मध्ये 198 वे स्थान मिळाले होते. 2023 च्या सर्वेक्षणाचा निकाल विलंबाने म्हणजे जानेवारी 2024 मध्ये जाहीर करण्यात आला होता. तर 2024 मध्ये स्वच्छ सर्वेक्षणच झाले नव्हते. आता थेट 2025 मध्ये सर्वेक्षणासाठी पथक बेळगावला येत आहे. स्वच्छ सर्वेक्षण करत असताना नागरिकांची मते जाणून घेतली जातात, ही मतेच महत्त्वाची असून सदस्यांकडून यावेळी शहर स्वच्छतेबाबत नागरिकांची मते आजमावली जाणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article