महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केंद्र सरकारचा ‘उल्फा’शी ऐतिहासिक शांतता करार

06:51 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आसाममधील दहशतवादाचा अंत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल : अनुप चेतिया गट मुख्य प्रवाहात सहभागी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारत सरकार, युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) आणि आसाम सरकार यांच्यातील त्रिपक्षीय शांतता करारावर शुक्रवारी स्वाक्षरी करण्यात आली. केंद्र सरकार आणि आसाम सरकारने 40 वर्षात पहिल्यांदाच उल्फा या दहशतवादी संघटनेच्या प्रतिनिधींशी शांतता समझोता कराराच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली आहे. भारत सरकारच्या ईशान्येतील शांतता प्रयत्नांच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. या कराराची अंमलबजावणी होत असतानाच 700 उल्फा कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केले आहे. ईशान्येकडील सशस्त्र दहशतवादी संघटनांसोबत भारत सरकारचा या वर्षातील हा चौथा मोठा करार आहे.

उल्फा गेल्या अनेक वर्षांपासून ईशान्येकडील राज्यात सशस्त्र सुरक्षा दलांविऊद्ध हिंसक संघर्ष करत आहे. हा हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. त्यानुसारच ‘उल्फा’शी शांतता करार करण्यासाठी शुक्रवारी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत ऐतिहासिक शांतता कराराला मूर्त स्वरुप देताना गृहमंत्री अमित शाह, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, गृह सचिव अजय भल्ला, आसामचे डीजीपी जीपी सिंग आणि उल्फा गटाचे सदस्य उपस्थित होते. परेश बऊआ यांच्या नेतृत्वाखालील ‘उल्फा’चा कट्टरपंथी गट या कराराचा भाग नाही. सरकारने प्रस्तावित केलेल्या करारात सामील होण्यास या गटाने नकार दिल्याने त्यांना सध्या सामावून घेण्यात आलेले नाही.

आसामच्या भविष्यासाठी उज्ज्वल दिवस : अमित शाह

उल्फासोबत झालेल्या करारावर गृहमंत्री अमित शाह यांनी समाधान व्यक्त केले. आसामच्या भविष्यासाठी हा उज्ज्वल दिवस आहे. आसामसह ईशान्य भारतात गेल्या अनेक दशकांपासून हिंसाचार होत आहे. नरेंद्र मोदी आल्यापासून आम्ही ईशान्येला हिंसामुक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या पाच वर्षांत ईशान्येमध्ये 9 करारांवर (सीमा शांतता आणि शांतता करारांसह) स्वाक्षऱ्या झाल्याचे त्यांनी नमूद केले. आसाममधील 85 टक्के भागातून ‘आफस्पा’ हटवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आसाममधील हिंसाचार त्रिपक्षीय कराराद्वारे सोडवला जाऊ शकतो. अनेक दशकांपासून उल्फाने केलेल्या हिंसाचारात 10,000 लोक मारले गेले. आसाममधील बंडखोरीवर हा संपूर्ण उपाय आहे. सर्व विभागांची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी केली जाईल, असे शाह यांनी स्पष्ट केले.

‘उल्फा’चे 20 नेते आठवडाभर दिल्लीत

वास्तविक, उल्फा अर्थात युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसामचे 20 नेते गेल्या आठवडाभरापासून दिल्लीत होते. भारत सरकार आणि आसाम सरकारचे उच्च अधिकारी या कराराचा मसुदा तयार करत होते. ‘उल्फा’च्या अनुप चेतिया गटाने या शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे. या गटाने 2011 पासून शस्त्र हाती घेतलेले नाही, परंतु औपचारिक शांतता कराराचा मसुदा तयार करण्याची आणि दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींनी त्यावर स्वाक्षरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article