महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सेंट्रल इंग्लिश स्कूलची उत्तुंग भरारी

05:54 PM Dec 09, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पंचायत समिती सावंतवाडी आयोजित ५१ वे सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२३ - २४ कलंबिस्त हायस्कूल सावंतवाडी येथे दि . ०२ डिसेंबर २०२३ व ०३ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न झाले.या विज्ञान प्रदर्शनात सेंट्रल इंग्लिश स्कूलने उल्लेखनीय यश प्राप्त केले. शिक्षक प्रतिकृती माध्यमिक विभागात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या विज्ञान विषय शिक्षिका श्रीम. शीतल शशिकांत मोरजकर यांच्या ' नेक्स्ट स्टेशन स्पेस मिशन' या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला. तसेच विज्ञान प्रतिकृती माध्यमिक विद्यार्थी विभागात कु. नाजमीन संजय तडवी हिच्या ' झिरो वेस्टर ' या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला. या दोन्ही प्रतिकृतींचे प्रदर्शन स्थळी उपस्थितांनी भरभरून कौतुक केले.

Advertisement

सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक - शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी प्रशालेच्या विज्ञान विषयशिक्षिका श्रीम. शीतल मोरजकर व विद्यार्थिनी कु. नाजमीन तडवी यांचे अभिनंदन केले आहे .

Advertisement

Advertisement
Tags :
tarun bharat news
Next Article