काजोल-ट्विंकलच्या चॅट शोमध्ये दिग्गजांची हजेरी
आमिर-सलमानची एकत्र उपस्थिती, गोविंदासह अनेक कलाकार दिसणार
प्राइम व्हिडिओवर नवा चॅट शो सुरू झाला असून यात बॉलिवुडच्या अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना सूत्रसंचालन करत आहेत. या शोचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून यात अनेक अतिथींची झलक दिसून आली आहे. परंतु सलमान आणि आमिर खानच्या जोडीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. ‘टू मच’ या चॅट शोमध्ये अनेक अतिथी सामील होत असल्याचे दिसून येणार आहे. शोच्या ट्रेलरमध्ये गोविंदा आणि चंकी पांडे यांचीही जोडी दिसून आली आहे. गोविंदा यात स्वत:चा आयकॉनिक डायलॉग बोलत असल्याचे आणि चंकी पांडे हास्यविनोद करत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे.
‘टू मच’ चॅट शोमध्ये वरुण धवन आणि आलिया भट्ट देखील सामील झाली आहे. तसेच विक्की कौशल, क्रीति सेनॉन, करण जौहर, जान्हवी कपूर यासारखे कलाकारही यात सामील झाले आहेत. काजोल आणि ट्विंकलचा हा नवा टॉक शो 25 सप्टेंबरपासून अमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम झाला आहे.