For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निकालानंतर उमरग्यात शिंदे गटाकडून आनंदोत्सव

11:12 AM Jan 11, 2024 IST | Kalyani Amanagi
निकालानंतर उमरग्यात शिंदे गटाकडून आनंदोत्सव
Advertisement

उमरगा प्रतिनिधी

Advertisement

विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असा निकाल दिल्यानंतर उमरगा शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक उमरगा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.

शिवसेना अपात्र निकाल प्रकरणात विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे काय निकाल देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. नार्वेकर यांनी शिवसेना शिंदेंचीच निकाल दिला आणि सर्वत्र शिवसैनिकांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली. धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला तसेच आमदार ज्ञानराज चौगुले यांचा उमरगा विधानसभा मतदार संघ आहे.

Advertisement

यावेळी तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, माजी नगराध्यक्ष बालाजी(तात्या) सुरवसे, उपतालुकाप्रमुख शेखर पाटील, माजी नगरसेवक संतोष सगर, नाना मदनसुरे, अरूण जगताप, उद्धव(बापू) मुळे, सुहास पाटील, राजू हन्नुरे, बळी कदेरे, बाजार समिती संचालक सचिन जाधव, विद्यार्थी सेना ता.प्रमुख संदीप चौगुले, युवासेना शहरप्रमुख अमर शिंदे, गोपाळ जाधव, शफी चौधरी, शहाजी येळीकर, मनोज जाधव, प्रवीण माशाळकर, दिनेश बिराजदार, आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.