For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कडोलीत प्रियांका जारकीहोळींच्या विजयाचा आनंदोत्सव

10:48 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
कडोलीत प्रियांका जारकीहोळींच्या विजयाचा आनंदोत्सव
Advertisement

वार्ताहर /कडोली 

Advertisement

चिकोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका सतीश जारकीहोळी निवडून आल्याने कडोली येथील काँग्रेस कार्यकर्त्यांत जल्लोष करण्यात आला. गेल्या दि. 7 मे रोजी चिकोडी मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान झाले होते. तेव्हापासून काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी आणि भाजपचे आण्णासाहेब जोल्ले यांच्यापैकी कोण निवडून येणार? याची उत्सुकता लागून राहिली होती. यामध्ये काँग्रेसच्या प्रियांका जारकीहोळी या भरघोस मतांनी निवडून आल्याने कडोली परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. यावेळी येथील छत्रपती शिवाजी चौकात केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ग्रा. पं. अध्यक्ष सागर पाटील, उपाध्यक्षा दीपा मरगाळे, ग्रा. पं. माजी अध्यक्ष अण्णू कटांबळे, जि. पं. माजी उपाध्यक्ष अरुण कटांबळे, ग्रा. पं. सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.