महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अनाथांना फराळ वाटप करून साजरी केली दिवाळी

10:43 AM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : मराठी विद्यानिकेतनतर्फे दरवर्षी गरजू अनाथांना दिवाळीचा फराळ व कपड्यांचे वाटप करण्यात येते. यावर्षीही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गरीब, अनाथ तसेच उपेक्षीत व कष्टकऱ्यांच्या घरीही दिवाळीचा आनंद साजरा व्हावा, विद्यार्थ्यांना समाजातील तळागाळातील लोकांची ओळख व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील फराळ व चांगल्या प्रकारचे कपडे शाळेत जमा केले. कपडे व फराळ ज्योतीनगर, गणेशपूर येथील विद्यार्थ्यांना व इव्हॉन लोमॅक्स यांच्या होम फॉर होमलेस अनाथालयातील वृद्धांना भेट देण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यात आला. ज्योतीनगर येथील शाळेतील मुख्याध्यापक मासेकर, शिंदोळकर मॅडम उपस्थित होते. यावेळी विद्यानिकेतन शाळेचे मुख्याध्यापक गजानन सावंत, शीतल बडमंजी, मंजुषा पाटील, अश्विनी हलगेकर, सुनीता पाटील, माजी विद्यार्थी सूरज हत्तलगे, प्रसाद सावंत यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article