कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गणेशोत्सव-ईद ए मिलाद शांततेत पार पाडा

06:22 AM Aug 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/   खानापूर

Advertisement

गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस आणि इतर प्रशासन सहकार्य करण्यास तयार आहेत. सामाजिक शांतता सलोखा आणि कायदा सुव्यवस्था ढासळू न देता उत्सव आनंदाने आणि शांततेत पार पाडण्यात यावा, तसेच शासनाच्या मार्गसूचीनुसारच सर्व गणेश मंडळांनी पालन करावे, दोन्ही सण एकोप्याने पार पाडण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक लालसाब गवंडी यांनी पंचायत सभागृहातील शांतता सभेत केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार दुंडाप्पा कोमार होते. व्यासपीठावर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट, ज्येष्ठ नागरिक चंबाण्णा होसमणी, स्थायी समिती अध्यक्ष अप्पय्या कोडोळी होते.

Advertisement

उपनिरीक्षक एम. बी. बिरादार यांनी स्वागत करून गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सण शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. गणपती मंडळासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली असून आवश्यक परवानगी तातडीने देण्यात येतील, डॉल्बीचा वापर करू नये, आगमन आणि विसर्जन मिरवणुका वेळेत पार पाडाव्यात, मंडपातील व्यवस्था चोख राखण्यात यावी, सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावा, रुग्णवाहिकेचे नियोजन करावे, मंडपात कोणतेही गैरकृत्य होणार नाही याची खबरदारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागेल असे कृत्य करू नये, याची खबरदारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, गणेश मंडळाला पोलीस तसेच हेस्कॉम आणि नगरप्रशासन आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार आहे. डॉल्बीवर पूर्णपणे बंदी असल्याने डॉल्बी वापरण्यास सक्त मनाई असल्याचे जाहीर करण्यात आले.

नगरसेवक लक्ष्मण मादार म्हणाले, गणेशोत्सव काळात नगरपंचायतीकडून सर्व सहकार्य करण्याची तयारी केली असून पाचव्या दिवसांपासून ते अकराव्या दिवसाच्या विसर्जनापर्यंत घाटावर क्रेनची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच बुधवार दि. 20 रोजी पूर्व तयारीसाठी नगरपंचायतीची बैठक आयोजित केली आहे. तरी नागरिकांनी आपल्या समस्या असल्यास बैठकीत मांडण्याचे आवाहन केले. यावेळी प्रकाश देशपांडे म्हणाले, हेस्कॉमने विद्युत समस्याबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी योग्य नियोजन करावे, संजय कुबल म्हणाले, गणेश चतुर्थीच्या काळात मंडळाने पावित्र्य राखून गणेशोत्सव साजरा करावा, गणेश महामंडळाचे अध्यक्ष पंडित ओगले यांनी शहरातील 16 गणेश मंडळापैकी 10 ते 12 गणेश मंडळानी पारंपरिक वाद्यात विसर्जन मिरवणूक आयोजित केल्या आहेत. त्यामुळे डॉल्बीला फाटा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील वर्षापासून पूर्णपणे ध्वनीप्रदूषणमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक काढण्याचे आश्वासन दिले.

रवी काडगी, अमृत पाटील, गु•t टेकडी, प्रसाद पाटील, महांतेश राऊत, प्रकाश बैलूरकर, नगरपंचायतीचे अभियंते तिरुपती राठोड, गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharatSocialMedia
Next Article