दसरोत्सव शांततेत-उत्साहात साजरा करा
मार्केट पोलीस स्थानकात शांतता कमिटी बैठकीत आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
दसरोत्सवाला गुरुवार दि. 3 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. नवरात्रोत्सव सण शांततेत साजरा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. इतर कोणत्याही धर्मियांच्या भावना दुखावू नयेत, याची काळजी घ्यावी, असे आवाहन मार्केट पोलीस स्थानकाचे निरीक्षक महांतेश धामण्णावर यांनी केले आहे.
शनिवारी पोलीस स्थानकामध्ये शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी त्यांनी सर्वांना हे आवाहन केले. दसरोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. काही ठिकाणी दांडिया तसेच इतर कार्यक्रम आयोजित केले जातात. त्या ठिकाणी अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत हे सर्व कार्यक्रम पार पाडावेत. याचबरोबर इतर धार्मिक कार्यक्रमही करताना काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर यांच्यासह मार्केट परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.