महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यात दिवाळी साजरी करा!

12:21 PM Jan 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त मुख्यमंत्र्यांचे आवाहन : सांखळी रवींद्र भवनात कार्यक्रमांचा घेतला आढावा

Advertisement

सांखळी : ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहात होतो तो क्षण आता जवळ आला आहे. अयोध्येत श्रीराम जन्मभूमीत भव्य मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. हा सोहळा पाहण्याची संधी सर्वांना ऑनलाईन उपलब्ध कऊन दिली जाणार आहे. हे राष्ट्र मंदिर आहे यात श्रीराम विराजमान होत असल्याने राज्यात दिवाळी साजरी करा, विद्युतरोषणाई कऊन आपला परिसर चमकवा. त्याचबरोबर प्रत्येकाने आपापल्या परिसरातील मंदिरांची स्वच्छता करा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना दिवसानिमित्त सांखळी मतदारसंघातील शहर तसेच ग्रामीण भागातील सर्व प्रमुख मंदिर परिसरात धार्मिक व सांकृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे अयोजन यशस्वीरित्या करण्यासाठी सांखळी रवींद्र भवन सभागृहात खास बैठकीचे आयोजन कारण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी संपूर्ण कार्यक्रमांविषयी सविस्तर माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, नगराध्यक्ष रश्मी देसाई, सरपंच  कामत, कालिदास गावस, कृष्णा गावस, अंकुश मळीक, राजन फाळकर शिवदास मुळगावकर, गुरूप्रसाद नाईक, देवस्थान अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक आणि रामभक्त यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बैठकीचे स्वागत गोपळ सुर्लकर यांनी केले.

Advertisement

सांखळी मतदारसंघातील प्रमुख मंदिरांमध्ये कार्यक्रम

पाळी, सुर्ल, कुडणे, आमोणा, न्हावेली, वेळगे, हरवळे आणि सांखळी येथील प्रमुख मंदिरांमध्ये सकाळपासून विविध धार्मिक व सांकृतिक कार्यक्रम मंदिर पुजारी, देवस्थान अध्यक्ष व शैक्षणिक संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. यात प्रभू श्रीरामांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम होणार आहेत. मंदिरात धार्मिक कार्यक्रम झाल्यावर महाप्रसादाचे आयोजन केले असून संध्याकाळी गावातील प्रत्येक मंदिरात दीपोत्सव साजरा होणार आहे. आपापल्या घरात प्रत्येकाने आकशकंदील व दीप पेटवून दिवाळी साजरी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील जनतेला या बैठकीत मार्गदर्शन करताना केले आहे.

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सार्वजनिक सुट्टी

प्रभू श्रीराम यांचा मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा प्रत्येकाला अनुभवता यावा यासाठीं सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तेव्हा सर्व शिक्षक आणि विद्यार्थी  वर्ग कार्यक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. अंगणवाडी ते उच्चशिक्षित विद्यार्थी वर्ग या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

प्रत्येक गावात खास कार्यक्रम समितीची निवड

मतदारसंघात श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्dयानिमित प्रत्येक ठिकाणी खास कार्यक्रम समिती निवडण्यात आली असून घराघरात आमंत्रणे देण्यात आली आहे. गावात कसलेही राजकारण न करता उत्सव साजरा होणार असून प्रत्येकाला या कार्यक्रमांचे आमंत्रण देण्यात आले आहे. तेव्हा सर्वांनी यात सहभागी व्हावे. प्रभू श्रीराम हे सगळ्dयांचे आहेत, फक्त भाजपचा असे कोणीही समजू नये असा सूरही या बैठकीत उमटला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article