महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सीई20 क्रायोजेनिक इंजिन ‘गगनयान’ मोहिमेसाठी सज्ज

06:20 AM Feb 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मानवरहित मिशनसाठी तयार इंजिनलाही मिळाली मंजुरी

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर गगनयान मिशनवर आता जलदगतीने काम सुरू झाले आहे. गगनयान मिशन भारताची पहिली मानवयुक्त मोहीम असणार आहे. ही मोहीम भारतासाठी अत्यंत खास आहे. या मोहिमेत यश आल्यास अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारत अशाप्रकारची कामगिरी करणारा चौथा देश ठरणार आहे. इस्रोने या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. सीई20 क्रायोजेनिक इंजिन आता गगनयान मिशनसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. अनेक अवघड परीक्षणांनंतर सीई20 क्रायोजेनिक इंजिनला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे.

सीई20 क्रायोजेनिक इंजिन आता गगनयान मिशनसाठी पूर्णपणे तयार आहे. कठोर परीक्षणांमध्ये इंजिनची क्षमता सिद्ध झाली आहे. पहिले मानवरहित उ•ाण एलव्हीएम3 जी1 साठी तयार करण्यात आलेल्या सीई20 क्रायोजेनिक इंजिनला अनेक परीक्षणांना सामोरे जावे लागले, त्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र मिळू शकल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले.

सीई20 इंजिनचे ग्राउंड क्वालिफिकेशन टेस्टचा अंतिम टप्पा 13 फेब्रुवारी रोजी पूर्ण झाला होता. याच्या अंतर्गत क्रायोजेनिक इंजिनच्या मानव रेटिंग प्रक्रियेला यशस्वी मानले गेले असल्याची घोषणा इस्रोने बुधवारी केली आहे. इंजिन योग्यप्रकारे काम करणार की नाही हे जाणून घेण्यासाठी ग्राउंड क्वालिफिकेशन टेस्ट आवश्यक असते. इंजिन सुरक्षेच्या स्वरुपात कसे आहे आणि ते पूर्णपणे तयार आहे की नाही हे देखील या परीक्षणातून स्पष्ट होते. कठोर सुरक्षा आणि विश्वसनीयतेचे निकष इंजिन पूर्ण करते के नाही हे देखील पाहिले गेले आहे.

7 टप्प्यांमधील परीक्षण

हे परीक्षण 7 टप्प्यांमध्ये पार पडले असून ज्यानंतर सीई20 इंजिनला सुरक्षित मानले गेले आहे. अखेरचे परीक्षण वॅक्यूम इग्निशन टेस्टच्या सीरिजचे 7 वे परीक्षण होते. वॅक्यूम इग्निशन टेस्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण याचा थेट संबंध एलव्हीएम3 लाँच व्हेईकल उ•ाणानंतरच्या कालावधीशी आहे.

चालू वर्षी मोहिमेची तयारी

2024 हे गगनयान मोहिमेच्या तयारीचे वर्ष राहणार आहे. तसेच हेलिकॉप्टरमधून ड्रॉप टेस्ट देखील केली जाणार आहे, ज्यात पॅराशूट सिस्टीमची पडताळणी केली जाणार आहे. अशाप्रकारच्या अनेक ड्रॉप टेस्ट करण्यात येतील. याचबरोबर अनेक व्हॅल्युएशन परीक्षण करण्यात येणार आहेत. याचबरोबर चालू वर्षात जीएसएलव्हीला प्रक्षेपित करण्यात येईल. चालू वर्षात कमीतकमी 12 मिशन प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. हार्डवेअरच्या उपलब्धतेच्या आधारावर ही संख्या वाढू शकते असे उद्गार इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी काढले आहेत.

गगनयान मोहीम

गगनयान मोहिमेच्या अंतर्गत इस्रो अंतराळवीरांना अंतराळात पाठविण्याची तयारी करत आहे. या मोहिमेत तीन जणांना अंतराळात पृथ्वीच्या कनिष्ठ कक्षेत पाठविले जाईल आणि मग त्यांना सुखरुप पृथ्वीवर परत आणले जाणार आहे. 2025 मध्ये ही मोहीम प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य आहे. इस्रोची ही मोहीम यशस्वी ठरली तर अंतराळशक्ती म्हणून भारताचा नावलौकिक आणखी वाढणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article