For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जुन्या धारवाड ओव्हरब्रिजखाली सीडीच्या कामाला सुरुवात

10:35 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
जुन्या धारवाड ओव्हरब्रिजखाली सीडीच्या कामाला सुरुवात
Advertisement

महापालिकेने दखल घेतल्याने समाधान

Advertisement

बेळगाव : जुन्या धारवाड रोडवरील जिजामाता चौकाजवळ असलेल्या ओव्हरब्रिजच्या खाली सीडीवर्क करण्यासाठी खोदाई करण्यात आली. या परिसरात नेहमीच दुकानांमध्ये तसेच घरांमध्ये पाणी शिरत आहे. त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत होता. याची दखल महापालिकेने घेतली असून पाण्याचा निचरा करण्यासाठी सीडीवर्कचे काम सुरू केले आहे. पाऊस पडल्यानंतर जिजामाता चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहात होते. गटारीतील तसेच ड्रेनेजचे पाणी अनेकांच्या दुकानांमध्ये शिरून मोठे नुकसान होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या निर्माण झाली आहे.पाऊस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेला त्याठिकाणी जाऊन गटारी स्वच्छ कराव्या लागत आहेत. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आता सीडीवर्क करून गटारीचे पाणी त्याला जोडण्यासाठी या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.