For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेंगळुरात रेव्ह पार्टीवर छापा सीसीबी पोलिसांची कारवाई

06:54 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेंगळुरात रेव्ह पार्टीवर छापा सीसीबी पोलिसांची कारवाई
Advertisement

तेलगू अभिनेत्रींसह 100 हून अधिक जण सहभागी : ड्रग्ज जप्त

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

बेंगळूरच्या इलेक्ट्रॉनिक सिटी येथील फार्महाऊसमध्ये मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर केंद्रीय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. यावेळी आंध्रप्रदेशमधून तेलगू अभिनेत्रींना आणून रेव्ह पार्टी करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. ड्रग्जचाही वापर झाला असून एमडीएमए, कोकेन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असून एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

Advertisement

इलेक्ट्रॉनिक सिटीजवळील जी. आर. फार्महाऊसमध्ये हैदराबाद येथील वासू नामक व्यक्तीने पार्टीचे आयोजन केले होते. त्याने अनेक जणांना विमानाने हैदराबादहून बेंगळूरला आणले होते. पार्टीत बेंगळूर आणि आंध्रप्रदेशमधील 100 हून अधिक धनाढ्यांच्या मुलांचा सहभाग होता. 25 मुलीही पार्टीत सहभागी झाल्या होता. डीजे, मॉडेल, सॉफ्टवेअर इंजिनिअर, तेलगू अभिनेत्रीही सहभागी झाल्या होत्या. प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री हेमा ही देखील सहभागी झाल्याचे आढळून आले आहे.

फार्महाऊस गोपाल रेड्डी यांच्या मालकीचा

‘सन सेट टू सनराईस व्हिक्टरी’ या नावाने रविवारी सायंकाळी 5 पासून सोमवारी पहाटे 6 पर्यंत पार्टी करण्याचा बेत होता. पार्टीसाठी सुमारे 30 ते 50 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. मध्यरात्री 2 पर्यंत पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने सीसीबी पोलिसांच्या नार्कोटीक्स विभागाच्या पथकाने 3 वाजता फार्महाऊसवर छापा मारून अनेक जणांना ताब्यात घेतले. सदर फार्महाऊस गोपाल रेड्डी यांच्या मालकीचे आहे. या कारवाईवेळी फार्महाऊसमध्ये जग्वार, मर्सजिझ बेंझ, ऑडी यासारख्या आलिशान कार आढळून आल्या आहेत. एका कारमध्ये आंध्रप्रदेशधील आमदार काकनी गोवर्धन रेड्डी यांच्या नावाचा पासही आढळला आहे.

पाच जणांना अटक

पार्टीच्या ठिकाणी श्वानपथकाच्या साहाय्याने तपासणी करण्यात आली. पार्टीसाठी आणलेले 15.56 ग्रॅम एमडीएम, 6.2 ग्रॅम कोकेन, 6 ग्रॅम हायड्रो गांजा, 5 मोबाईल व दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ताब्यात घेतलेल्यांची कसून चौकशी केली जात आहे.

Advertisement
Tags :

.