मोईत्रांसंबंधी सीबीआयचा लोकपालांना अहवाल सादर
कॅश फॉर व्होट प्रकरण
वृत्तसंस्था/ कोलकाता
कॅश फॉर व्होट प्रकरणात महुआ मोईत्रा यांच्यासंबंधी सीबीआयने लोकपालांना अहवाल सादर केला आहे. या प्रकरणात आता महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध काय कारवाई करावी हे लोकपाल ठरवतील. लोकपालांच्या सूचनेनुसार सीबीआयने महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला होता. आता सीबीआयने आपला तपास अहवाल सीबीआयला सादर केला आहे. या प्रकरणात महुआने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ट्विट केले आहे. मला सीबीआय चौकशीबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. लोकपाल कायद्याअंतर्गत आदेशाची प्रत लोकपाल वेबसाईटवरही अपलोड केलेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय तपास संस्था सीबीआयने तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशी सुरू केली होती. हा खटला कॅश फॉर क्वेरी प्रकरणाशी संबंधित आहे. लोकपालांच्या सूचनेनंतर सीबीआयने तपास सुरू केला आहे. या तपासाच्या आधारे एजन्सी मोईत्रा यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करायचा की नाही हे ठरवेल. प्राथमिक तपासाअंतर्गत सीबीआय कोणत्याही आरोपीला अटक करू शकत नाही किंवा शोध घेऊ शकत नाही, परंतु ती माहिती मागवू शकते.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध लोकपालकडे तक्रार केली होती. त्यांच्यावर व्यापारी हिरानंदानी यांना संसदेचा आयडी आणि पासवर्ड दिल्याचा आरोप होता. त्यानंतर, चौकशीसाठी एक नीतिमत्ता समिती स्थापन करण्यात आली. समितीने 10 नोव्हेंबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना आपला अहवाल पाठवून मोईत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केली होती.