महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अखिलेश यादव यांना सीबीआयची नोटीस

06:48 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खाण प्रकरणात साक्षीदार म्हणून समन्स

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना बेकायदेशीर खाण प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) समन्स बजावले आहे. त्यांना गुरुवार, 29 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील सीबीआय कार्यालयात हजर राहण्याची नोटीस प्राप्त झाली आहे. अखिलेश यादव यांना साक्षीदार म्हणून हजर राहण्यास सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना अखिलेश यांनी स्वत: हा खुलासा केला. गेल्या निवडणुकीपूर्वीही नोटीस आली होती आणि या निवडणुकीतही नोटीस आली असल्याचे त्यांनी नमूद केले. सीबीआयची ही नोटीस लोकसभा निवडणुकीशीही जोडली जात आहे. अखिलेश यादव यांनी याबाबत भाष्य करताना पूर्वी काँग्रेस सरकारने आपल्याला सीबीआय क्लबमध्ये टाकले होते. आणि आता भाजपही तेच करत असल्याचे ते पुढे म्हणाले.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article