कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सीबीआय संचालक प्रवीण सूद यांना मुदतवाढ

06:44 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

केंद्र सरकारने सध्याचे केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ एका वर्षासाठी वाढवला आहे. आता ते पुढील एक वर्षासाठी देशातील सर्वात मोठ्या तपास संस्थेचे प्रमुख राहतील. या संदर्भात कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने आदेश देखील जारी केले आहेत. त्यानुसार सीबीआय संचालक प्रवीण सूद पुढील एक वर्षासाठी या पदावर राहतील. प्रवीण सूद यांचा कार्यकाळ 25 मे रोजी संपत होता.

Advertisement

सीबीआयचे संचालक प्रवीण सूद यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळू शकते अशी अटकळ यापूर्वीच बांधली जात होती. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवीन संचालकांच्या निवडीबाबत एक बैठक झाली. यामध्ये पंतप्रधानांसह, सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. बैठकीत कोणत्याही नवीन नावावर एकमत होऊ शकले नाही.

प्रवीण सूद हे 1986 च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सीबीआय संचालक होण्यापूर्वी ते राज्याचे डीजीपी होते. त्यांनी 25 मे 2023 रोजी सीबीआय संचालकपदाची सूत्रे स्वीकारली. ते मूळचे हिमाचल प्रदेशचे आहेत. त्यांनी आयआयटी-दिल्लीमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article