30 वर्षांमध्ये घराखाली गुहेचे जाळे
लोक पाहून होतात थक्क
लोक स्वत:च्या घराला सुंदर करण्यासाठी स्वत:चे नवनवे आकार देत असतात. काही लोक स्वत:च पूर्ण घर उभारण्याचा निश्चय करतात. परंतु युकेच्या साउथपोर्टच्या एका इसमाने स्वत:च्या पत्नीच्या स्मृतिप्रित्यर्थ स्वत:च्या साधारण दिसणाऱ्या घराखाली गुहांचे अनोखे जाळे निर्माण केले आहे. फ्रान्सिस प्रॉक्टरने हे सर्व 30 वर्षांच्या मेहनतीने तयार केले आहे. सामान्य दिसणाऱ्या घराच्या उद्यानाखाली एक अत्यंत असाधारण जग लपले आहे. 76 वर्षीय फ्रान्सिस यांनी स्वत:च्या घरामागील बगिच्यात 20 फूट खोल गुहा, कॉरिडॉर आणि विचित्र संरचनांचे एक जाळे खोदले आहे.
मजेशीर बाब म्हणजे हे सर्वकाही नियोजित योजनेच हिस्सा नव्हते. हा अनोखा प्रकल्प प्रारंभी एक बेकार विचार होता, आता हे नॅशनल गार्डन स्कीम अंतर्गत एक लोकप्रिय पर्यटनस्थळ ठरले आहे. जेव्हा आम्ही 50 वर्षांपूर्वी हे घर खरेदी केले होते, तेव्हा मी बगिच्याखालून जाणाऱ्या भूमिगत कक्षाची कल्पना करत होतो. हा विचार डर्बीशायरच्या ब्लू जॉन गुहेमुळे प्रेरित होता असे फ्रान्सिस सांगतात. त्या काळात फ्रान्सिस आणि त्यांच्या गणितज्ञ पत्नी बार्बरा यांनी या प्रकल्पाला मूर्त रुप देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घराचे ठिकाण एन्सडेल बीचनजीक किनारी रेतीच्या ढिगाऱ्यांवर आहे. जेथे वाळूत खोदल्याने संरचना ढासळण्याचा धोका होता. परंतु बार्बरांच्या गणितीय गणनांमुळे या अशक्य वाटणऱ्या कामाला शक्य करता आले.
वाळूत खोदल्याने ते ढासळू शकत होते, याचमुळे गुहा तयार करणे जवळपास अशक्य वाटत होते. परंतु आमच्या घराच्या विस्तारादरम्यान पाया मजबूत केला होता. बार्बराने ब्ल्यूप्रिंट्सचे अध्ययन पेल आणि हे अत्यंत सोपे असल्याचे सांगितले. तिच्या गणनांच्या आधारावर आम्ही हळूहळु खोदणे सुरू केले. तिच्या गणना अचूक होत्या आणि दोघांनी मिळून 20 फूट खोल गुहा तयार केल्याचे फ्रान्सिस यांनी सांगितले.
अनोखी भूलभुलैया
या भूमिगत भूलभुलैयामध्ये एक फूटब्रिज, पाण्याचा प्रवाह आणि जगभरातून जमा करण्यात आलेल्या विचित्र कलाकृती सामील आहेत. हे स्थान केवळ गुहांपुरती मर्यादित नाही, यात एक रोमँटिक ढांचा आणि अन्य मनोरंजक वैशिष्ट्योही आहेत, जी याला एक जादुई जगाचे स्वरुप मिळवून देतात. हा प्रकल्प माझ्यासाठी रिकामी वेळेत करण्याचे काम होते, परंतु आता हे एक लोकप्रिय आकर्षण ठरले आहे. हा बगीचा बार्बराच्या स्मृतीला समर्पित आहे, तिचा चार वर्षांपूर्वी मृत्यु झाला असल्याचे फ्रान्सिस यांनी सांगितले. हा बगीचा केवळ एक रचनात्मक कामगिरी नसून फ्रान्सिस आणि बार्बराच्या प्रेम आणि सहकार्याची कहाणी देखील आहे.