विमान अपघात वृत्ताबाबत सावधगिरीचा सल्ला
अमेरिकेकडून दोन माध्यमांना नोटीस
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकन एजन्सीने अहमदाबाद विमान अपघातावरील मीडिया रिपोर्ट्सबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. अहमदाबाद विमान अपघाताबाबत प्रकाशित झालेल्या वृत्तांबाबत वॉल स्ट्रीट जर्नल आणि रॉयटर्स या दोन प्रमुख अमेरिकन माध्यम संस्थांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. दोन्ही माध्यम संस्थांनी पुष्टी न करता दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती प्रकाशित केल्यामुळे मृत वैमानिकांच्या प्रतिष्ठेला गंभीर नुकसान झाल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे.
विमान अपघाताबाबत आतापर्यंतच्या प्राथमिक तपासात सध्या ज्या गोष्टी उघडकीस आल्या आहेत त्या फक्त अटकळ आहेत. भारताच्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (एएआयबी) नुकताच आपला प्रारंभिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या प्रकारच्या तपासाला वेळ लागतो, असे यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डच्या अध्यक्षा जेनिफर होमंडी म्हणाल्या. होमंडी यांची ही टिप्पणी अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्ताबाबत आहे. तीन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तात विमानाचा कॅप्टन सुमित सभरवालने इंजिनांना इंधन पुरवठा थांबवल्यामुळे 12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे फ्लाइट एआय-171 टेकऑफनंतर कोसळल्याचे म्हटले आहे. यासंबंधी दोन माध्यमांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.