Kolhapur : कासारवाडी परिसरात गव्यांचा धुमाकूळ; ज्वारी पिकाचे सात ते आठ एकर नुकसान
कासारवाडी शिवारात गव्यांचा आतंक वाढला; शेतकरी संतप्त
टोप : कासारवाडी शेती परिसरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांच्या कळपाचा उच्छाद वाढत असून कासारवाडी अंबपवाडी मध्यभागी असणाऱ्या चांदसूर्या टेक परिसरातील शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल १४ ते १५ गव्यांचा कळप या परिसरात गुरुवारी सायंकाळी चार वाजता वावरत असलेला काही शेतकऱ्यांना दिसला, गव्यांनी सात ते आठ एकर जमिनीवरील ज्वारी पिक पुन्हा खाऊन फस्त केले आहे.
वन विभागाकडे शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाय योजना केलेल्या नाहीत.मागील आठवड्यात झालेल्या नुकसानीचा पंचनाम केला आहे. पन त्याची पूर्तता वनविभागाने केलेले नसल्याची शेतकऱ्याने तक्रार केली आहे.
शिवारात घटनास्थळी येण्याची तसदी घेतली नसल्याचे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आम्हाला नुकसान भरपाई नको पण वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त हवा काबाडकष्टाने पिकवलेले पिक क्षणात वाया जात असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
गव्यांना जंगलाच्या अधिवासाकडे हाकावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त व शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानी बाबत आमदार खासदार यांनी विधानसभा व लोकसभेत प्रश्न उपस्थित करुन निर्णय घ्यावा अशी मागणी कासारवाडीतील शेतकऱ्या कडून होत आहे.