महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तेलंगणात 5 नोव्हेंबरपासून जातनिहाय सर्वेक्षण

06:18 AM Oct 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेस सरकारने घेतला निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

तेलंगणातील काँग्रेसच्या ए. रेवंत रेड्डी सरकारने राज्यात जातनिहाय सर्वेक्षण करविण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता पावलेही उचलण्यात आली आहेत. तेलंगणा मागास वर्ग आयोगाने राज्यभरात जातनिहाय सर्वेक्षण करण्याच्या प्रक्रियेच्या अंतर्गत इच्छुक घटकांकडून अर्ज प्राप्त करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे.

केंद्र सरकार राष्ट्रीय जनगणना करविण्याच्या तयारीत असताना तेलंगणा सरकारने हे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारकडून पुढील वर्षी जनगणनेचे कार्य सुरू होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2021 मध्ये कोरोना संकटामुळे जनगणनेची प्रक्रिया टाळण्यात आली होती.

राज्य सरकार 4-5 नोव्हेंबरपासून जातनिहाय सर्वेक्षण सुरू करणार असून ही प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाकडून जातनिहाय सर्वेक्षणासाठी एका प्रारुपाला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यासोबत देशभरात जातनिहाय सर्वेक्षण करविण्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आश्वासनाच्या अनुरुप हे सर्वेक्षण करविले जात असल्याचे राज्याचे मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी सांगितले आहे. सर्वेक्षणाच्या कार्यात 80 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना सामील केले जाणार असून याकरता त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती प्रभाकर यांनी दिली आहे.

तेलंगणापूर्वी बिहारमध्ये जातनिहाय सर्वेक्षण पार पडले आहे. या सर्वेक्षणावर बिहारमध्ये वाद निर्माण झाला होता. तसेच राज्य सरकार अशाप्रकारचे सर्वेक्षण करवू शकते असा प्रश्न उभा ठाकला होता. तर दुसरीकडे काँग्रेस प्रत्येक राज्यासाठीच्या स्वत:च्या घोषणापत्रात जातनिहाय सर्वेक्षण करविण्याचा मुद्दा सामील करत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article