For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काजू बी अनुदान योजनेस 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

03:26 PM Dec 01, 2024 IST | Radhika Patil
काजू बी अनुदान योजनेस 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
Cashew seed subsidy scheme extended till December 31
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

राज्य काजू मंडळाच्या माध्यमातून काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘काजु बी अनुदान योजना’ जाहीर केलेली आहे. या योजनेस 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती कृषि पणन मंडळचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी दिली.

काजू उत्पादक शेतकरी या योजनेचे लाभार्थी असतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या सातबारावर काजू लागवडीची/झाडांची नोंद असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षम काजुंच्या झाडांची संख्या व त्यापासून प्राप्त काजू बी उत्पादन याबाबतचा दाखला देणे आवश्यक आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीकडील नोंदणीकृत परवानाधारक काजू व्यापारी, नोंदणीकृत सहकारी संस्था, खरेदी-विक्री संघ व नोंदणीकृत काजू प्रक्रियादार यांना काजू बी ची विक्री केलेली असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याने विक्री केलेल्या काजूची विक्री पावतीवर सदर नोंदणीकृत खरेदीदाराचा जीएसटी क्रमांक, शेतकऱ्याचे संपूर्ण नाव व पत्ता असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे काजू उत्पादक शेतकऱ्यांनी आधार सल्लगणीत बचत बॅंक खात्याचा क्रमांकसह तपशील द्यावा.

Advertisement

काजू बी अनुदानासाठी विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य काजू मंडळाकडे 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करायचे होते. मात्र योजना सर्वसामान्य काजू उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याने व जास्तीत जास्त काजू उत्पादक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी योजनेस 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. काजु बी अनुदान योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव महाराष्ट्र राज्य काजू मंडळ, उपविभागीय कार्यालय, पंचायत समिती शेजारी, चंदगड येथे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.