For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काजूचा हंगाम संपला, दरात वाढ

10:35 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
काजूचा हंगाम संपला  दरात वाढ
Advertisement

बेळगाव : शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळवून देणारा काजू हंगाम संपला आहे. मात्र काजू हंगाम सरते शेवटी दर वाढू लागला आहे. 90 ते 100 रुपये किलो असणारा काजू दर शेवटच्या टप्प्यात 115 रुपयांच्या पुढे गेला आहे. मात्र शेतकऱ्यांनी यापूर्वीच काजू विक्री केल्याने यंदा देखील उत्पादकांना काजू दराचा फटका बसल्याचे दिसत आहे. मागील चार वर्षांत काजू उत्पादकांना कमी दराचा फटका सहन करावा लागत आहे. यंदा काजू उत्पादकांना योग्य भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र उत्पादकांना केवळ 100 रुपयांवर समाधान मानावे लागले आहे. आता हंगाम संपल्यानंतर काजूचा दर 115 रुपयांपर्यंत गेला आहे. बेळगाव आणि खानापूर तालुक्यात काजू बागायतीचे क्षेत्र आहे. विशेषत: तालुक्यातील पश्चिम भागात काजूचे उत्पादन होते. अलिकडे काजू बागायत क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे साहजिकच काजू उत्पादनातही वाढ झाली आहे. मात्र दरवर्षी काजूच्या दराबाबत अडचणी येऊ लागल्या आहेत. काजू विक्रीसाठी बाजारपेठ किंवा योग्य हमीभाव मिळत नसल्याने मिळेल त्या दराला विक्री करण्याची वेळ उत्पादकांवर येत आहे. कोकणातील चांगल्या दर्जाची रोपे आणून लागवड केली जात आहे. त्यामुळे क्षेत्रही वाढू लागले आहे. मात्र योग्य भाव मिळत नसल्याने अडचणी येत आहेत. बेळगाव तालुक्यातील उत्पादकांना चंदगड तालुक्यातील बाजारपेठेवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे दराचा फटका बसू लागला आहे. काजू फॅक्टरीवाले मनमानी दर ठरवू लागले आहेत. त्यामुळे उत्पादकांना दरापासून वंचित रहावे लागत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.