For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फॉर्मिंग ज्वेलरीवाल्यावर अखेर गुन्हा दाखल

03:34 PM Sep 25, 2025 IST | Radhika Patil
फॉर्मिंग ज्वेलरीवाल्यावर अखेर गुन्हा दाखल
Advertisement

सातारा :

Advertisement

साताऱ्यात दुर्गेत्सवाच्या पहिल्याच दिवशी सकाळी एका फॉर्मिंग ज्वेलरीच्या दुकानाच्या समोरच महिलांची तोबा गर्दी जमली होती. जमलेल्या गर्दीमुळे शनिवार चौक ते पोवई नाका या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. त्यावरुन त्या ज्वेलरीवाल्या दुकानमालकावर आणि त्याच्या मॅनेजरवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे दोघांना आता पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागणार आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी, साताऱ्यातल्या एका फॉर्मिंग ज्वेलरी शॉपवाल्याने आपल्या दुकानाची जाहिरात इंन्स्टावर स्टोरी ठेवून ती 50 जणांनी पाहिल्याचा स्क्रीन शॉट घेवून येणाऱ्या पहिल्या 1 हजार महिलांना 1 आपट्याचे पान आणि 1 ग्रॅम फार्मिग ज्वेलरी मोफत देण्यात येईल अशी ऑफर ठेवल्याने अनेक महिलांनी त्या दुकानदारांच्या इन्स्टाला फॉलो करुन स्क्रीन शॉट घेवून महिला जिह्याच्या कानाकोपऱ्यातून मिळेल त्या वाहनाने साताऱ्यात दि. 22 रोजी दुर्गा उत्सवाचा पहिला दिवस असूनही पोहोचल्या. सकाळी दुकान उघडण्यास जेव्हा त्या दुकानाचे कर्मचारी आले तेव्हा त्यांना महिलांची तोबा गर्दी पाहून काही सुचेना झाले. त्याने तरीही शटर उघडले. परंतु महिलांची गर्दी पहाता त्यांनी फोन फिरवून त्याची माहिती मालकांना देताच त्याने पुन्हा शटर डाऊन करुन तेथून पळ काढला. मात्र, महिलांच्या ही बाब निदर्शनास येताच तेथेच थांबून राहिल्या. त्यामुळे साताऱ्यात सकाळीच 10 ते 12 या दरम्यान, शनिवार चौक ते पोवई नाका जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली.

Advertisement

सातारा शहर पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी त्या महिलांना समजून सांगितले. तेव्हा त्या महिला परत फिरल्या. परंतु त्यांनी मीडियाजवळ जाहिरात देवून बोलवले येथे तर केवळ प्रवासखर्च तरी त्या दुकानदाराने द्यावा. आमची फसवणूकच केली अशी प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. 23 रोजी त्या दुकानदाराने मीडियाच्या प्रतिनिधींकडे घडलेल्या प्रकाराचा खुलासा दिला. खुलासा देता देता त्याच्या तेंडाला चांगलाच फेस आला होता.

दरम्यान, सातारा शहर पोलीस ठाण्यात हवालदार विश्वनाथ मेचकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार पेठेत गुरु अलंकार अपार्टमेंट समोर शनिवार चौक ते पोवई नाका जाणाऱ्या रस्त्यावर दि. 22 रोजी सकाळी 11 वाजता अण्णा शिवाजी मगर (रा. वांझोळी), व मॅनेजर ज्ञानेश्वर औदूंबर गोरे (रा. ओगलेवाडी) यांनी 1 ग्रॅम मिनी गंठण फॉर्मिंग ज्वेलरी फ्री ऑफर ठेवून महिला ग्राहकांची गर्दी जमवून वाहतूक अडथळा निर्माण केला म्हणून भारतीय न्याय संहिता कलम 126 2 अन्वये गुन्हा दाखल केला. तपास हवालदार घोडके हे करत आहेत. त्यामुळे फॉर्मिंग ज्वेलरीवाल्याला अखेर पोलीस ठाण्याची वारी करावी लागणार हे नक्की.

Advertisement
Tags :

.