महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

क्रिकेटपटू एस. श्रीशांतवर केरळ पोलिसांकडून गुन्हा

07:00 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

18.70 लाखांच्या फसवणुकीचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था /तिरुअनंतपुरम

Advertisement

क्रिकेटपटू एस. श्रीशांत आणि अन्य दोघांवर केरळ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. उत्तर केरळ जिल्ह्यातील सरिश गोपालन नामक व्यक्तीने त्यांच्यावर 18.70 लाख ऊपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. श्रीशांत, राजीव कुमार आणि व्यंकटेश किणी यांनी 25 एप्रिल 2019 पासून कर्नाटकातील कोल्लूर येथे स्पोर्ट्स अकादमी सुरू करण्याच्या नावाखाली आपल्याकडून अनेकवेळा ही रक्कम घेतली होती, असे तक्रारदार गोपालन यांनी म्हटले आहे. तसेच आपल्याला अकादमीमध्ये भागीदार बनण्याची ऑफर देण्यात आल्यामुळे आपण पैसे गुंतवल्याचेही त्याने स्पष्ट केले. श्रीशांत आणि इतर दोन आरोपींविऊद्ध कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article