127 वर्षांपासून कारवर बंदी
घोडागाडीने होतो प्रवास
सध्याचे जग हे अत्यंत विकसित असून येथे वेगाला अधिक महत्त्व आहे. परंतु एक असे ठिकाण आहे, जेथे तुम्ही कार चालवू शकत नाही. तेथे ये-जा करण्यासाठी केवळ आणि केवळ घोडागाडीवर अवलंबून रहावे लागते.
एका ठिकाणी कार चालविण्यावर बंदी आहे. येथे केवळ सायकल्स आणि घोडागाडीच चालविली जाते. आश्चर्याची बाब म्हणजे हे ठिकाण जगातील सर्वात विकसित देश असलेल्या अमेरिकेत आहे. या ठिकाणी हवेची गुणवत्ता इतकी चांगली आहे की प्रदूषणाच्या सान्निध्यात राहणाऱ्या लोकांना येथे आल्यावर अत्यंत आनंद होत असतो.
अमेरिकेच्या मिशिगनमध्ये असलेल्या मॅकिनॅक काउंटीत मॅकिनॅक बेट आहे. येथे मागील 127 वर्षांपासून मोटर व्हेईकल्सवर बंदी आहे. ही बंदी 1898 मध्ये घालण्यात आली हीत. यामुळे या पूर्ण बेटावर एकही कार दिसून येणार नाही. येथील लोक घोडागाडी आणि सायकल्सने प्रवास करतात. या बंदीचा परिणाम म्हणजे येथील हवेची गुणवत्ता आहे.
अत्यंत सुंदर बेट
ह्यूरन सरोवरानजीक या समर रिसॉर्ट सिटीत जाण्यासाठी फेरीची मदत घ्यावी लागते. बेटावरील लोकसंख्या सुमारे 600 इतकी असून हे बेट स्वत:च्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. लोक येथे मोठ्या संख्येत पर्यटनासाठी येत असतात. विशेषकरून जून महिन्यात लीलॅक फेस्टिव्हल आणि फॉल फोलिएज पाहण्यासाठी लोक येथे पोहोचत असतात.