For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Sports: अ.भा. कॅरम स्पर्धेत आरिफ विजेता, मुंबईचा मोहम्मद गुफरान उपविजेता

01:35 PM Jun 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
kolhapur sports  अ भा  कॅरम स्पर्धेत आरिफ विजेता  मुंबईचा मोहम्मद गुफरान उपविजेता
Advertisement

तिघा कॅरमपटूंनी ब्लॅक टू फिनीश करत उपस्थितांची वाहव्वा मिळवली

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापुरात प्रथमच आयोजित केलेल्या ऑल इंडिया लेव्हल शारंग चषक कॅरम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उत्तरप्रदेशचा चॅम्पियन मोहम्मद आरिफने मुंबईच्या मोहम्मद गुफरानवर 16-13 25-12 अशा सरळ गेम फरकाने विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले.

पाच राज्यांमधील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांसह राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 264 कॅरमपटूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेचे संयुक्त कोल्हापूर कॅरम असोसिएशन व शारंग चषक कॅरम स्पर्धा कमिटीने आयोजन केले होते. सानेगुरुजी वसाहत, राजोपाध्येनगरातील बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा झाली.

Advertisement

स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात इर्शाद अहमदवर मोहम्मद आरिफने 23-1, 21-18 14- 10 अशा गेमफरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तसेच दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबईतील मोहम्मद गुफरानने मुंबईतीलच विश्वविजेत्या प्रशांत मोरेला 20-19, 21-8 अशा सरळगेमने पराभूत करत अंतिम फेरीत उडी घेतली होती.

दरम्यान, या स्पर्धेत गुरुचरण तांबेने पाचवा, जैद अहमदने सहावा आणि राहुल सोळंकीने सातवा क्रमांक, संजय मांडेने आठवा क्रमांक प्राप्त केला. बक्षीस वितरण समारंभात विजेत्या मोहम्मद आरिफला रोख 51 हजार रुपये व चषक आणि उपविजेत्या मोहम्मद गुफरानला 31 हजार रुपये व चषक असे बक्षीस देऊन गौरवले.

तसेच तिसऱ्या क्रमांक पटकावलेल्या इर्शाद अहमदला 21 हजार रुपये व चषक व चौथ्या स्थानावर राहिलेल्या प्रशांत मोरेला 11 हजार रुपये व चषक बक्षीस देऊन सन्मानित केले. 5 ते 8 या क्रमांकावर राहणाऱ्या कॅरमपटूंना प्रत्येकी 5 हजार आणि 9 ते 16 क्रमांक मिळवणाऱ्या कॅरमपटूंना प्रत्येकी 2 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरवले.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक व माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या हस्ते सर्वांनी बक्षीसे स्वीकारली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेले हर्षद गोठणकर, राहुल साळुंखे, ओमकार वडर, राजेश गोयल व संजय मांडे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.

यावेळी माजी नगरेसवक जयंत पाटील, सत्यजित कदम, अभिजीत चव्हाण, अभिजीत खतकर, अश्फाक आजरेकर, सुरज देशमुख, सुनील देसाई, अनिल इंगळे आदी उपस्थित होते. प्रसाद शेडे यांनी आभार मानले.

11 कॅरमपटूंचा रोख विशेष बक्षिसाने गौरव

क्रिकेट स्पर्धेत बळींची व फुटबॉल स्पर्धेत गोलची हॅटट्रीक करणे जसे प्रतिष्ठेचे मानले जाते तसे कॅरम स्पर्धेत ओपन टु फिनीश अथवा ब्लॅक टु फिनीश करण्याला प्रतिष्ठेचे मानले जाते. कोल्हापुरात गेली तीन दिवस सुऊ राहिलेल्या ऑल इंडिया लेव्हल शारंग चषक कॅरम स्पर्धेत तब्बल 8 कॅरमपटूंनी ओपन टू फिनीश करण्याचा करिष्मा केला.

तसेच तिघा कॅरमपटूंनी ब्लॅक टू फिनीश करत उपस्थितांची वाहव्वा मिळवली. ओपन टू फिनीश व ब्लॅक टू फिनीश करणाऱ्या आठही कॅरमपटूंना प्रत्येकी 2 हजार ऊपयांचे बक्षीस देऊन गौरवले. तसेच अंतिम सामन्यात ब्लॅक टू फिनीश करणाऱ्या मोहम्मद आरिफ याला पाच हजार ऊपयांचे बक्षीस देऊन गौरवले.

Advertisement
Tags :

.