For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार्लोस अल्कारेझ यूएस ओपन चॅम्पियन

06:55 AM Sep 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
कार्लोस अल्कारेझ यूएस ओपन चॅम्पियन
Advertisement

अंतिम लढतीत सिनरवर मात : कारकिर्दीतील सहावे ग्रँडस्लॅम जेतेपद

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

यंदाच्या वर्षातील झंझावाती फॉर्म कायम राखताना स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने युएस ओपन टेनिस स्पर्धेत इटलीच्या यानिक सिनरला नमवत जेतेपद पटकावले. रविवारी रात्री झालेल्या चुरशीच्या अंतिम लढतीत अल्कारेझने सिनरवर 6-2, 3-6, 6-1, 6-4 असा विजय मिळवला. विशेष म्हणजे, अल्कारेझचे युएस ओपन स्पर्धेचे दुसरे तर एकूण कारकिर्दीतील सहावं ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. जेतेपदासह 22 वर्षीय युवा टेनिसपटूने जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

Advertisement

न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात स्पॅनिश खेळाडू अल्कारेझने शानदार सुरुवात केली आणि पहिला सेट 6-2 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सिनरने पुनरागमन केले आणि 6-3 असा विजय मिळवला. यानंतर तिसऱ्या सेटमध्ये अल्कारेझने वर्चस्व गाजवले आणि फक्त एक गेम गमावत सेट 6-1 असा जिंकला. चौथ्या सेटमध्ये मात्र सिनरने कडवी झुंज दिली, परंतु अल्कारेझने सिनरचे आव्हान मोडीत काढत 6-4 असा विजय मिळवला आणि अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली.

 

जेतेपदानंतर अल्कारेझला लॉटरी

अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकावल्यानंतर अल्कारेझला 50 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 44 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. तर उपविजेत्या सिनरला 25 लाख डॉलर म्हणजेच 22 कोटी मिळाले. तसेच पुरुष एकेरीत उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या खेळाडूंना 11 कोटींचे बक्षीस दिले गेले. विशेष म्हणजे, यंदाच्या वर्षापासून अमेरिकन ओपन स्पर्धेच्या बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली आहे. स्पर्धेच्या बक्षीसाची रक्कम ही जवळपास 750 कोटी रुपये इतकी आहे. यामुळे पुरुष आणि महिला विजेत्यांना यंदाच्या वर्षी घसघशीत बक्षीस मिळाले आहे.

एकाच वर्षात ग्रँडस्लॅममध्ये तीन फायनल खेळणारी एकमेव जोडी

रविवारी कार्लोस अल्करेझ आणि यानिक सिनर या जोडीने अमेरिकन ओपनच्या कोर्टवर उतरताच इतिहास रचला. 2025 मध्ये ही जोडी तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅममध्ये आमने सामने आली होती. पुरुष एकेरीत एका कॅलेंडर ईयरमध्ये तीन वेळा फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध भिडणारी ही आतापर्यंतच्या इतिहासातील पहिली जोडी ठरली. याआधी हे दोघे यंदाच्या वर्षी फ्रेंच ओपन, विम्बल्डन स्पर्धेत आमनेसामने आले होते. फ्रेंच ओपनमध्ये अल्कारेझने बाजी मारली होती. त्यानंतर विम्बल्डनच्या हिरवळीत (ग्रास कोर्ट) फायनलमध्ये सिनरचा दबदबा पाहायला मिळाला होता. वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेत अल्काराझने बाजी मारल्याचे पहायला मिळाले. दुसरीकडे, यानिक सिनर एकाच वर्षात चार ग्रँडस्लॅमची फायनल गाठणारा चौथा खेळाडू ठरला. त्याच्या आधी रॉड लेव्हर (1969), रॉजर फेडरर (2006, 2007, 2008) आणि नोवाक जोकोविच (2015, 2021, 2023) यांनी ही कामगिरी केली आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची उपस्थिती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील अमेरिकन ओपनचा अंतिम सामना पाहण्यासाठी हजेरी लावली. ट्रम्प यांच्या आगमनामुळे सामना सुमारे अर्धा तास उशिरा सुरू झाला.

विम्बल्डनमधील पराभवानंतर या स्पर्धेत मी सरस खेळ केला. सिनरविरुद्धचा सामना नेहमीचा चुरशीचा राहिला आहे. अर्थात, रविवारच्या फायनलमध्ये मी सर्वोत्तम खेळ साकारला.

कार्लोस अल्कारेझ, अमेरिकन ओपन चॅम्पियन

Advertisement
Tags :

.