कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅरेबियन पाहुण्यांचा करेक्ट कार्यक्रम

06:58 AM Oct 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शुभमन गिलचे नाबाद शतक, टीम इंडियाचा 5/518 डाव घोषित : जडेजा-कुलदीपसमोर विंडीज फलंदाजांची नांगी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यातही पाहुण्या कॅरेबियन संघाची अवस्था बिकट केली आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळात यशस्वी जैस्वालचे द्विशतक हुकल्यावर कर्णधार शुभमन गिलच्या भात्यातून शतकी खेळी पाहायला मिळाली. पाचवी विकेट गमावल्यावर नाबाद 129 धावांवर खेळत असताना गिलने 5 बाद 518 धावांवर पहिला डाव घोषित केला. वेस्ट इंडिज संघाने दुसऱ्या दिवसाअखेर 140 धावांत 4 विकेट्स गमावल्या. विंडीजचा संघ अजूनही 378 धावांनी पिछाडीवर असून टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भारताने दुसऱ्या दिवशी 318 धावांवर आपला डाव सुरू केला. भारतीय फलदाजांनी दीड सत्रात 200 धावा जोडल्यानंतर डाव घोषित केला केला. तत्पूर्वी खेळाला सुरुवात झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल 175 धावांवर रनआऊट झाला, ज्यामुळे त्याचे द्विशतक हुकले. त्याने 258 चेंडूत 22 चौकारांसह 175 धावांची शानदार खेळी साकारली. यानंतर, कर्णधार गिलने नितीश कुमार रे•ाrसोबत चौथ्या गड्यासाठी 91 धावांची भागीदारी साकारली. नितीश त्याचे अर्धशतक पूर्ण करू शकला नाही आणि 43 धावांवर बाद झाला. त्यानंतर गिलने गियर बदलले आणि वेगाने खेळण्यास सुरुवात केली.

गिलचे 10 वे कसोटी शतक

दुसऱ्या सत्रात त्याने आपले 10 वे कसोटी शतक पूर्ण केले. गिलने जबरदस्त फलंदाजी करताना 177 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत 13 चौकार आणि 1 षटकार होता. गिलला ध्रुव जुरेलने चांगली साथ दिली. या दोघांनी विंडीज गोलंदाजांची चांगली धुलाई करताना शतकी भागीदारी साकारली. शतकानंतर गिल आक्रमक खेळत होता. यादरम्यान, जुरेलही अर्धशतकाच्या जवळ होता, पण त्याला 135 व्या षटकांत रोस्टन चेसने बाद केले. जुरेलने 79 चेंडूत 5 चौकारासह 44 धावा फटकावल्या. जुरेल बाद होताच गिलने भारताचा पहिला डाव घोषित केला. टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात 134.2 षटकांत 5 बाद 518 धावा केल्या. शुभमन गिल 129 धावांवर नाबाद राहिला. विंडीजकडून वॉरिकनने सर्वाधिक 3 बळी घेतले. रोस्टन चेसने 1 गडी बाद केला.

जडेजाचे 3 बळी, विंडीज फलंदाज पुन्हा अपयशी

टीम इंडियाने पहिला डाव घोषित केल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजीला आला. पण, त्यांच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. धावफलकावर 21 धावा असताना जॉन कॅम्पबेलच्या रुपात रवींद्र जडेजाने त्यांना पहिला धक्का दिला.  तेगनारायण चंद्रपॉल आणि अथनाझे या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. सेट झालेली ही जोडीही ज•tनेच फोडली. चंद्रपॉल 67 चेंडूत 34 धावा करून माघारी फिरला. कुलदीप यादवने अथनाजेला आपल्या जाळ्यात अडकवले. त्याने 84 चेंडूत 41 धावांची खेळी केली. ज•tने वेस्ट इंडिजचा कर्णधार रॉस्टन चेसला खातेही उघडू दिले नाही. यानंतर शाय होप आणि तेविन इमालॅच यांनी दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्यावेळी शाय होप 31 तर तेविन इमालॅच 14 धावांवर खेळत होता.

अहमदाबादच्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघाचा तिसऱ्याच दिवशी दारुण पराभव झाला होता. आता, दिल्ली कसोटीतही टीम इंडिया पाहुण्या संघाचा करेक्ट कार्यक्रम करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भारताकडून जडेजाने 3 तर कुलदीपने 1 विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव 134.2 षटकांत 5 बाद 518 घोषित (यशस्वी जैस्वाल 175, केएल राहुल 38, साई सुदर्शन 87, शुभमन गिल 196 चेंडूत 16 चौकार आणि 2 षटकारासह नाबाद 129, नितीश कुमार रे•ाr 43, ध्रुव जुरेल नाबाद 44, वॉरिकन 3 बळी, रोस्टन चेस 1 बळी)

वेस्ट इंडिज 43 षटकांत 4 बाद 140 (जॉन कॅम्पबेल 10, तेगनारायण चंदरपॉल 34, अथानेज 41, शाय होप नाबाद 31, इमलॅच नाबाद 14, रविंद्र जडेजा 3 बळी, कुलदीप यादव 1 बळी).

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गिलची 10 शतके, रोहितला टाकले मागे

गिलने भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये झळकावलेले 10 वे शतक ठरले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत हे त्याचे 10 वे शतक आहे. यासह तो भारतीय संघाकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम भारताची रोहित शर्माच्या नावावर होता. रोहितने या स्पर्धेत 9 शतके झळकावली होती. आता गिलने हा विक्रम मोडला आहे. गिल या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. या यादीत यशस्वी जैस्वालचा देखील समावेश आहे. यशस्वीच्या नावे 7 शतके असून ऋषभ पंतने 6 तर केएल राहुलने देखील 6 शतके झळकावली आहेत.

विराट विक्रमाशी बरोबरी

शुभमन एका वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये 5 शतके करणारा एकूण दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. विराटने 2017 आणि 2018 या वर्षांमध्ये कॅप्टन म्हणून प्रत्येकी 5-5 शतके झळकावली होती. विराटने 2017 साली 16 आणि 2018 मध्ये 24 डावात ही कामगिरी केली होती. तर शुभमनने अवघ्या 12 डावात कॅप्टन म्हणून 5 शतके केली आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article