For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हाँगकाँगमध्ये लँडिंगदरम्यान समुद्रात कोसळले कार्गो विमान

06:35 AM Oct 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
हाँगकाँगमध्ये लँडिंगदरम्यान समुद्रात कोसळले कार्गो विमान
Advertisement

हाँगकाँग :

Advertisement

हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली आहे. एमिरेट्स एअरलाइनचे बोइंग 747 कार्गो विमान लँडिंगदरम्यान धावपट्टीवरून घसरुन थेट समुद्रात कोसळले आहे. लँडिंगवेळी हे विमान ग्राउंड क्रूच्या एका वाहनाला धडकले होते, ज्यानंतर ही दुर्घटना घडली असून यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक जण विमानतळ कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर विमानातील चारही क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही दुर्घटना पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली असून त्यावेळी जोरदार वारे अन् प्रतिकूल हवामान होते असे पोलिसांकडून सांगण्यात आले. विमान धावपट्टीवर उतरताच गस्त वाहनाला धडकले होते. ही टक्कर अत्यंत तीव्र असल्याने वाहन समुद्रात जाऊन कोसळले होते आणि काही क्षणातच  विमान देखील धावपट्टी ओलांडून समुद्रात पडले. टक्कर होण्याच्या प्रसंगावेळी विमानाचा वेग सुमारे 49 नॉट म्हणजेच 90 किलोमीटर प्रतितास इतका होता.

हे विमान सुमारे 32 वर्षे जुने होते आणि तुर्कियेतील मालवाहू कंपनी एअरअॅक्ट एमिरेट्सकडून संचालित केले जात होते. या कार्गो विमानाने दुबईच्या अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उ•ाण केले होते.  दुर्घटनेनंतर हाँगकाँग विमानतळ प्राधिकरणाने त्वरित आपत्कालीन बचाव अभियान सुरू केले. अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी पाण्यात अडकलेल्या क्रू सदस्यांना बाहेर काढले. तर सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळावरील एक धावपट्टी तूर्तास बंद ठेवण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.