For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार्बनचक्र असंतुलन, उष्णतेत वाढ

07:00 AM Apr 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
कार्बनचक्र असंतुलन  उष्णतेत वाढ
Advertisement

मानवी घडामोडींमुळे बिघडले संतुलन

Advertisement

पृथ्वीवर तापमान वाढण्याच्या पूर्वी करण्यात आलेली अनुमान वास्तविकता कमी पडू शकते. कारण कार्बन चक्राच्या जािटल प्रक्रिया म्हणजेच मिथेन उत्सर्जन आणि पर्माफ्रॉस्टचे वितळणे, हवामान बदलाला आणखी वेगवान करू शकतात. म्हणजेच कार्बन चक्र असंतुलनामुळे जागतिक उष्णतेत मोठी वाढ होऊ शकते. ही माहिती पॉट्सडॅम इन्स्टीट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्चकडून करण्यात आलेल्या एका अध्ययनात समोर आली आहे.

पृथ्वीवर अनेक नैसर्गिक प्रणाली अस्तित्वात असून त्या जीवनाच्या संतुलनाला कायम राखतात आणि त्यातील एक सर्वात महत्त्वपूर्ण प्रणाली कार्बन चक्र आहे. म्हणजेच ही प्रक्रिया अशा मार्गाला दर्शविते, ज्यामुळे कार्बन वातावरण, समुद्र आणि जीवांदरम्यान पोहोचतो. यात ते स्त्राsत सामील आहेत, जे वातावरणात कार्बन सोडतात आणि ते स्थान देखील आहेत, जे वातावरणातून कार्बन शोषून घेत असतात. दुर्दैवाने औद्योगिक क्रांतिनंतर मानवी घडामोडींमुळे हे संतुलन बिघडले असून कार्बन चक्र आता स्वत:च्या नैसर्गिक वेगाशी ताळमेळ राखू शकत नसल्याची स्थिती आहे.

Advertisement

पृथ्वीचे हवामान मॉडेल

संशोधकांनी पुढील 1 हजार वर्षांपर्यंतच्या पृथ्वीच्या हवामान मॉडेलचे अध्ययन केले आणि मानवी घडामोडींमुळे झालेले छोटे-छोटे उत्सर्जन देखील कार्बन चक्राच्या प्रतिक्रियांच्या अंतर्गत मोठी उष्णता निर्माण करू शकतात  असे त्यांना आढळून आले. याचा  अर्थ भविष्यात हवामान आणखी अस्थिर होऊ शकते, ज्यामुळे तापमान वृद्धीची शक्यता आणखी वाढते.

हवामान बदलाचे अनुमान

जसजशी पृथ्वी प्रणाली लवचिकता गमावत चालली आहे, तसतसे हवामान बदलाचे अनुमान आणखी कठिण होत चालले असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. लवकरच पावले उचलली न गेल्यास तापमान अनियंत्रित स्वरुपात वाढू शकते, ज्यामुळे पॅरिस कराराचे लक्ष्य केवळ एक राजकीय आकांक्षा ठरण्याची शक्यता आहे. भविष्यात एक वास्तव्ययोग्य ग्रह सुनिश्चित करण्यासाठी उत्सर्जनात वेगवान आणि निर्णायक कपात होण्याची कठोर गरज असल्याचे संशोधकांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.