कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सीसीटीव्ही फुटेज देऊनही कार चोरीचा तपास नाहीच

12:10 PM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शहर-तालुक्यात दहापेक्षा अधिक ईको कारची चोरी

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यात वाहने चोरीचे प्रकार थांबता थांबेनात. अनेक ठिकाणी गुन्हेगारांची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊनही गुन्हेगार सापडत नाहीत, अशी स्थिती आहे. चोरट्यांनी मारुती सुझुकी ईको कारना आपले लक्ष्य बनविले असून बेळगाव परिसरात सुमारे 10 हून अधिक कार चोरीला गेल्याची माहिती मिळाली आहे. शिवाजी कॉलनी, टिळकवाडी येथील अभिषेक नागेश बांदिवडेकर यांची केए 25 एमसी 7362 क्रमांकाची ईको कार चोरीला गेली आहे. 30 एप्रिल रोजी मध्यरात्री कारची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. अभिषेक यांनी यासंबंधी टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. कार चोरणाऱ्या चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना दिले आहे.

Advertisement

टिळकवाडी, एपीएमसीसह शहरातील विविध पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात एका पाठोपाठ एक ईको कार चोरण्यात आल्या आहेत. यापैकी एकाही प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले नाही. अभिषेक यांची कार चोरल्यानंतर चोरटा कारसह कोल्हापूरच्या दिशेने गेल्याचा संशय आहे. सीसीटीव्ही फुटेज देऊनही तपास पुढे सरकत नाही, अशी स्थिती आहे. चोऱ्या, घरफोड्यांबरोबरच मोटारसायकली व कार चोरीच्या घटना वाढल्या आहेत. घरासमोर उभी करण्यात आलेली वाहने किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अनेक प्रकरणात पेट्रोल किंवा डिझेल संपल्यानंतर गुन्हेगार एखाद्या ठिकाणी वाहन उभे करून दुसऱ्या वाहनातून जातात. गेल्या दोन ते तीन महिन्यांत बेळगावातून चोरीला गेलेल्या एकाही कारचा तपास लागला नाही. त्यामुळे तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article